IMPIMP

Pune Corporation | 24 तास पाणी पुरवठा योजना : 5 वर्षात ८४ पैकी केवळ ३५ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  महापालिकेच्या (Pune Corporation) चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाण्यांच्या टाक्यांचे काम संथगतिने सुरू आहे. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ८४ टाक्यांच्या कामापैकी जेमतेम ३५ च टाक्यांचे काम झाले असून विहीत मुदतीत हे काम पुर्ण न झाल्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजनेला विलंब होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. (Pune Corporation)

शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठीच्या सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या योजनेला २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली.
२०१६ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) आणि कॉंग्रेस आघाडीची (Congress) महापालिकेमध्ये (Pune Corporation) सत्ता होती.
डिसेंबर २०१६ मध्ये पहिल्या टप्प्यात या योजनेतील ८४ पाण्याच्या टाक्यांच्या कामांची २४७ कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली आहे. २०१९ पर्यंत या टाक्यांचे काम पुर्ण करणे अपेक्षित होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेत (Pune Corporation) सत्तांतर झाले.
परंतू भूसंपादनातील अडचणी तसेच काही माननीयांनी त्यांच्या प्रभागातील पाण्याच्या टाक्यांच्या कामांमध्ये आणलेले अडथळे यामुळे टाक्यांचे काम बर्‍याचअंशी रखडले.
त्यामुळे आतापर्यंत जेेमतेम ३५ टाक्यांचेच काम होउ शकले आहे. तर काही टाक्यांचे काम अद्यापही सुरू आहे.
टाक्यांच्या कामाला देण्यात आलेली मुदतवाढ २०२३ पर्यंत आहे. कामाचा वेग पाहाता २०२३ पर्यंत हे काम पुर्ण होईल की नाही, याची अद्याप शाश्‍वती नाही.

शहरात ज्याठिकाणी टाक्यांची कामे झाली आहेत, त्यापैकी अनेक टाक्या अद्याप पाईपलाईनने जोडण्यात आलेल्या नाहीत.
त्यामुळे बांधलेल्या टाक्यांचा पाणीसाठा वाढविण्यासाठीही उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे चोवीस तास पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत होण्यासही बराच अवधी लागणार असून या योजनेचा खर्चही वाढणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

Web Title : Pune Corporation | 24 Hour Water Supply Scheme: Only 35 out of 84 water tanks completed in 5 years

हे देखील वाचा :

Gold Price Today | धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण ! आता 28024 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Uddhav Thackeray | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी

Related Posts