IMPIMP

Pune Corporation | बाजीराव रस्त्यावरील पाईपलाईनचे काम पुर्णत्वाकडे ! बाजीराव रस्त्याकडेच्या पेठा आणि शिवाजीनगर गावठाणाला लवकरच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा

by nagesh
Pune Corporation | Bajirao road pipeline work nearing completion! Adequate water supply to Petha and Shivajinagar villages near Bajirao road soon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Corporation | शहराच्या मध्यवर्ती भागाला पाणी पुरवठा करणार्‍या बाजीराव रस्त्यावरील (Bajirao Road) मुख्य पाईपलाईनचे (Pipe Line) काम जवळपास पुर्ण होत आले आहे. येत्या दोन आठवड्यात हे काम पुर्ण झाल्यानंतर जुन्या वाहीनीतून होणारा पाणी पुरवठा बंद (water supply in pune) करण्यात येणार आहे. यामुळे बाजीराव रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि पुढे शिवाजीनगर परिसरात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल, असा दावा Pune Corporation पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर (PMC Aniruddha Pawaskar) यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लॉकडाउनच्या काळात शहरात अत्यंत गजबजलेल्या आणि अरुंद रस्त्यांनी वेढलेल्या मध्यवर्ती शहरात पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईनचा यामध्ये समावेश आहे. या भागात पर्वती जलकेंद्रातून पाणी पुरवठा होतो. पर्वती येथून बाजीराव रस्ता आणि होल्गा चौकातून स्वारगेट व भवानी पेठेतील (Swargate to Bhavani Peth) परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य वाहीन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यापैकी बाजीराव रस्त्यावरील पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी ६०० मी.मी.व ३०० मी.मी. व्यासाच्या दोन लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. बाजीराव रस्त्यावरील पाईपलाईन बदलण्याचे काम सुरु असताना करण्यात आलेल्या खोदाई दरम्यान अनेक ठिकाणी जुनी पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेज असल्याचे आढळून आले. प्रामुख्याने पाईपलाईनच्या जॉईंटच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी गळती होत आहे. या लाईन्सच्या गंजल्याने आणि पाणी गळतीमुळे अपुरा दाब निर्माण होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, नवीन पाईपलाईनवरून पाणी पुरवठा सुरू केल्यास बाजीराव रस्ता परिसरातील सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठेसोबतच शुक्रवार पेठ, कसबा पेठ आणि पुढे शिवाजीनगर गावठाण परिसरात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. दरम्यान, नुकतेच स्थानीक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी अधिकार्‍यांसमवेत काम सुरू असलेल्या परिसराची पाहाणी करुन वेळापत्रकानुसार कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

लक्ष्मी रस्त्याचे काम सोमवारपासून !

कोरोना लॉकडाउनची संधी साधत महापालिकेने (Pune Corporation)
मध्यवर्ती भागातील लक्ष्मी, शिवाजी आणि बाजीराव रस्त्यासोबतच अन्य
रस्त्यांवर पाणी पुरवठा योजना आणि ड्रेनेज लाईनची कामे हाती घेतली आहेत.
मागील ४० ते ४५ वर्षात येथील ड्रेनेज लाईनची कामेच झाली नव्हती.
या कामांमुळे मागील सहा ते आठ महिन्यांहून अधिक काळापासून वरिल सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत.
अनलॉक आणि पावसाळ्यामध्ये तर हे सर्वच रस्ते खड्डेमय झाले आहेत.
खोदाईची कामे झाल्यानंतर सर्वच रस्त्यांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील ड्रेनेजलाईन व पाईपलाईनची कामे झाली असल्याने येत्या सोमवारपासून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
युद्धपातळीवर साधारण आठ दिवसांत हे काम करण्यात येईल, अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्हि.जी. कुलकर्णी (Chief Engineer V.G. Kulkarni) यांनी सांगितले.

Web Title :- Pune Corporation | Bajirao road pipeline work nearing completion! Adequate water supply to Petha and Shivajinagar villages near Bajirao road soon

हे देखील वाचा :

TATA Power Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! टाटा पाॅवरमध्ये लवकरच भरती; पगार 3 लाखांपर्यंत, जाणून घ्या

Sapna Chaudhary | प्रदर्शित होताच सपना चौधरीचा अल्बन साँग ‘अलट-पलट’ झाला सुपरहिट (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | फडणवीसांचा संजय राऊतांना ‘टोला’; म्हणाले – ‘अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू’

Related Posts