IMPIMP

Pune Corporation | नगरसेवकांच्या आवडत्या निधीला आयुक्तांची ‘कात्री’, सह यादीतील कामे न करण्याचे आदेश

by bali123
Pune PMC Budget | Budget of Pune Municipal Corporation on March 24; The budget is likely to be in excess of Rs 8500 crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिकेत (Pune Corporation) वित्तीय समितीवरून नगरसेवक विरुद्ध प्रशासन (Pune Corporation) असा सामना रंगला आहे. या समितीच्या माध्यमातून स्थायी समिती तसेच नगरसेवकांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याचा सुर आवळला जात आहे. आता पालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी नगरसेवकांचा आवडता निधी असणाऱ्या सह यादीवरील एकही काम करू नका, असे आदेश वित्तीय समितीच्या बैठकीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना झटका मानला जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोनाच्या परिस्थितीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे, त्यामुळे सहाजिकच विकास कामे करताना मोठी अडचण होत आहे. आयुक्तांनी नुकतेच सह यादीतील 30% पेक्षा जास्त कामे करण्यास नकार दिला होता. त्यामुळे नगरसेवकांनी आयुक्तां विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. यामध्येच आता आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांना सह यादीतील एक ही काम करू नये, असे आदेश दिले आहेत. तसेच खात्यांचे देखील अति महत्वाचे काम असेल तरच त्याला परवानगी दिली जाईल, असं बैठकीमध्ये सांगितले आहे. नगरसेवकांना आपल्या ‘मनासारखी’ विकास कामे करता येणार नाहीत. त्यामुळे पालिका प्रशासन (Pune Corporation) विरुद्ध माननीय हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

मंगळवारी सकाळी 9:30 वाजताच महिन्याभरानंतर महापालिका आयुक्तांनी वित्तीय समितीची बैठक घेतली. यावेळी विभाग प्रमुखांकडून खात्यांच्या कामाचे प्रस्तावासोबतच सह यादीवरील कामे मंजुरीसाठी मांडण्यात आली होती. मात्र आयुक्त विक्रम कुमार यांनी सुरुवातीलाच इथून पुढे सह यादीतील कुठलेही काम माझ्यासमोर आणू नका. त्याला मंजुरी दिली जाणार नाही. असे सांगितले. तसेच यापुढे खात्याची देखील अति महत्वाची असतील तरच आणि त्यालाही फक्त 30% इतकाच निधी उपलब्ध असेल, असे सांगितले आहे. विभाग प्रमुखांना याबद्दल विचारले असता त्यांनी देखील दुजोरा दिला आहे.

निधी देण्यावरून सत्ताधारी भाजप आणि आयुक्त असा वाद महापालिकेत रंगलेला पाहायला मिळाला होता.
शिवाय स्थायी समिती सदस्य आणि अध्यक्षांनी प्रशासनाचा निषेध करत स्थायी समिती देखील एकदा तहकूब केली होती.
यामध्येच आता विक्रम कुमार यांनी अशाप्रकारे निर्णय घेतल्याने, निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना प्रभागातील इच्छित कामे कशी करायची ? असा प्रश्न नगरसेवका पुढे उभा राहणार आहे.

Web Title : Pune Corporation | Commissioner’s ‘scissors’ to the favorite fund of the corporator, order not to do the work in the list

हे देखील वाचा :

Related Posts