IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित होणार नाहीत, मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिकेने (Pune Corporation) गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र पुणे
महापालिकेची (Pune Corporation) जर 5 मजली इमारतीसाठी परवानगी (Permission) असले आणि 9 मजली बांधकाम (Construction) केले
असेल तर अशा इमारतीच्या उर्वरित 4 मजल्यांना गुंठेवारी कायद्यांतर्गत (Gunthewari Act) नियमित करण्यासाठी जादाचे शुल्क (Extra Charges)
भरावे लागणार आहे. याशिवाय UDCPR (एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली) मधील वाढीव FSI नुसार अशी बांधकामे नियमित
केली जाणार आहे. याचा अर्थ सरसकट बांधकामे नियमित केली जाणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्यासाठी महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. यामध्ये मान्य एफएसआय (FSI) 1.10 वापरुन जी बांधकामे झाली आहेत. तीच बांधकामे नियमित (Regular) करण्यात येणार आहेत. पेक्षा अधिक एफएसआय वापरुन बांधकाम केले असेल, तर डिसेंबर 2020 मध्ये राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्यता दिलेल्या UDCPR मधील तरतुदीनुसार बांधकाम नियमित करण्यासाठी संबंधितांना 9 मीटर रुंदीच्यावरील रस्त्यावर बांधकाम असेल, तर प्रिमिअम एफएसआय (Premium FSI), अन्सलरी एफएसआय (Ansleri FSI) आणि टीडीआर (TDR) वापर करुन वरील बांधकाम नियमित करता येणार आहे. परंतु त्यासाठी काही अटी आहेत. (Pune Corporation)

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर बांधकाम केले असेल, तर ते मान्य एफएसआय 1.10 आणि त्यावर 60 टक्के अन्सलरी एफएसआय म्हणजे 1.70 एफएसआयपर्यंतचेच बांधकाम नियमित होणार आहे. मात्र, अन्सलरी एफएसआय वापरण्यासाठी जमिनीच्या रेडी-रेकनर मधील (Ready-Reckoner) दराच्या 15 टक्के शुल्क भरावे लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

80 टक्के इमारती 9 मीटर रुंदीच्या आत

पुणे शहरात (Pune City) मोठ्या प्रमाणावर गुंठेवारीची घरं आणि इमारती झाल्या आहेत. यापैकी 80 टक्के इमारती या 9 मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर झाल्या आहेत. तसेच 2 गुंठे जागेवर 5 आणि 6 पर्यंत एफएसआय वापरण्यात आला आहे. अशी बांधकामे नियमित करण्यासाठी यामुळे मर्यादा येणार आहेत. काही मजल्यापर्यंत महापालिका (PMC) किंवा जिल्हाधिकारी (Collector) मान्य ले आऊटपेक्षा (Building Layout Plan) अधिक बांधकाम केले आहेत त्यांना हा नियम लागू होतो.

35 टक्के दराने शुल्क भरावे लागणार

9 मीटर रुंदीच्या वरील गुंठेवारीच्या बांधकामांसाठी टीडीआर 20 टक्केच वापरण्यास परवानगी आहे. तर प्रीमियम एफएसआय वापराचा असेल, तर जागेच्या एकूण क्षेत्रफळाच्या 50 टक्केच वापरता येईल. त्यासाठी जमिनीचे रेडी-रेकनर मधील दराच्या 35 टक्के दराने शुल्क भरावे लागणार आहे. तर अन्सलरी एफएसआयसाठी जमिनीच्या रेडी रेकनरमधील दराच्या 15 टक्के दराने शुल्क भरावे (ready reckoner rate pune) लागणार आहे.

Web Title : Pune Corporation | Constructions in Pune Corporation limits will not be regular at all, huge fees will have to be paid

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘माझी बॅग वारंवार का चेक करता, बॅगेत बॉम्ब आहे’ ! तरुणाने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उडवून दिला गोंधळ

Jayant Patil | ‘एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल’, मुख्यमंत्र्यांवरील टीकेवरुन जयंत पाटलांचा खोचक टोला

Rank Pay Arrears | ‘इथं’ जमा आहेत हजारो निवृत्त अधिकार्‍यांचे कोट्यवधी रुपये, बँक खात्याची माहिती दिल्यास होईल मोठा फायदा

Related Posts