IMPIMP

Pune Corporation | लस आहे तर ती द्यायला सिरींजच नाहीत ! पुणे महापालिकेच्या लसीकरणात अडथळ्यांची शर्यत

by nagesh
Pune Corporation | If there is a vaccine, there are no syringes to give it! Obstacle race in Pune Municipal Corporation's vaccination

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Corporation | कोरोना प्रतिबंधित लस उपलब्ध आहे, पण ती टोचणार कशी ? असा प्रश्न महापालिकेच्या आरोग्य विभागाला पडला आहे. लसीचा डोस देण्यासाठी आवश्यक सिरींजचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत राज्य सरकारकडून सिरींज येण्याची शक्यता आहे. अन्यथा गुरुवारी लसकरणाचे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण (Pune Corporation) झाली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

जानेवारी महीन्यात देशांत लसीकरण सुरु झाले. दुसर्‍या लाटेनंतर लसीकरणाला वेग आला होता.
त्याकाळात लसीचा तुटवडा हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे. जुलै महीन्यापासून लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर लसीकरणाला गती मिळाली.
महापालिकेप्रमाणेच खासगी रुग्णालयातही लस मिळू लागल्याचा ही चांगला परीणाम दिसु लागला.
सध्या लसीचा पुरवठा सुरळीत असला तरी आता महापालिकेच्या समोर सिरींजची उपलब्धता ही महत्वाची अडचण ठरत आहे.
बुधवारी अनेक लसीकरण केंद्रांवर सिरींज नसल्याने लसीकरणाच्या कामावर परीणाम झाला होता.
दरम्यान, (Pune Corporation) प्रशासनाने लसीकरणाच्या कामावर परीणाम झाला नसल्याचा दावा केला आहे.
मात्र, राज्य सरकारकडून लस आल्या नाही तर गुरुवारी (आज ) लसीकरणाचे काम ठप्प पडू शकते असे प्रशासनाने मान्य केले आहे.

शहरांत आजपर्यंत फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरीक आणि अठरा वर्षापुढील नागरीक अशा एकुण ४४ लाख ४५ हजार ३३० डोस दिले गेले आहेत.
यामध्ये पहीला डोस घेणार्‍यांची संख्या २९ लाख ८३हजार १८२ इतकी असुन, दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या १४ लाख ६२ हजार १४८ इतकी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लसीकरणासाठी डोस आल्यानंतर त्याच्यासोबत सिरींजही पाठविल्या जातात. या सिरींज या दहा टक्के अधिक संख्येने पाठविल्या जातात.
हाताळणीत सिरींज खराब होण्याची शक्यता असल्याने त्याचा जास्त पुरवठा केला जातो. महापालिकेला सध्या प्रति दिन ५० हजार सिरींजची गरज आहे. सध्या केवळ दहा हजार सिरींजच उपलब्ध आहेत.
बुधवारी रात्रीपर्यंत राज्य सरकारकडून सिरींज येण्याची शक्यता आहे. या सिरींज आल्यातरच गुरुवारी लसीकरण होऊ शकते. (Pune Corporation)

लसीकरणासाठी आवश्यक सिरींजची कमतरता असली तरी लसीकरणाच्या कामावर बुधवारी काही परीणाम झालेला नाही.
महापालिका देखील स्वखर्चाने सिरींज विकत घेण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी निविदा काढावी लागेल. राज्य सरकारकडेही सिरींजची मागणी नोंदविली आहे.

– रविंद्र बिनवडे ( अतिरीक्त आयुक्त , पुणे मनपा )

– Ravindra Binwade (Additional Commissioner, Pune Municipal Corporation)

Web Title : Pune Corporation | If there is a vaccine, there are no syringes to give it! Obstacle race in Pune Municipal Corporation’s vaccination

हे देखील वाचा :

Pune Court | ‘या’ प्रकरणात गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Pune Court | गारवा हॉटेलच्या मालकाच्या खून प्रकरणात महिला आरोपीस जामीन

Income Tax Department | देशातील कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा ! प्रलंबित कर प्रकरणे निकाली काढण्याची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या नवीन तारीख

Related Posts