IMPIMP

Pune Corporation | स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2022-23 चे अंदाजपत्रक सादर करण्याचा बांधला चंग

14 मार्चला मुदत संपत असतानाही नगरसेवकांकडून पुढीलवर्षासाठी मागविली ‘स’ यादी; सुट्टीच्या दिवशी ‘स’ यादी देण्यासाठी नगरसेवकांची लगीनघाई

by nagesh
Pune PMC News | Rules for nameplates in the city soon I Love Board erected using illegal electricity will be removed Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिकेवर (Pune Corporation) प्रशासक नेमला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम असते असा दावा करणारे पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) स्थायी समितीच्या अध्यक्षांनी (PMC Standing Committee Chairman Hemant Rasne) सोमवारी (दि. १४ मार्च) २०२२-२३ या यावर्षीचे अंदाजपत्रक सादर करण्याचा चंग बांधला आहे. विशेष असे की आज महापालिकेला सुट्टी असतानाही नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागातील कामांसाठीची ‘स’ यादी मागविण्याची लगीनघाई सुरु होती. विशेष असे की अनेक नगरसेवकांनी कामांची आणि निधी मागणीची पत्रे देखिल स्थायी समिती अध्यक्षांकडे सादर केल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे महापालिकेच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर विहीत मुदतीत सार्वत्रिक निवडणुका न झाल्याने व विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपत असल्याने १५ मार्चपासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू महापालिकेमध्ये नवीन स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यमान स्थायी समिती ही कायम राहाते, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने राज्य सरकारकडे अभिप्राय देखिल मागविला आहे. (Pune Corporation)

दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी ७ मार्च रोजी २०२२-२३ या वर्षीचे सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक (PMC Budget) स्थायी समितीला सादर केले आहे. स्थायी समितीमध्ये ९ मार्चपासून या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू झाली असून पुढील बैठक सोमवारी १४ मार्चला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी सर्व नगरसेवकांकडून पुढील वर्षीच्या प्रभागातील कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यासाठी ‘स’ यादी मागविली आहे. आज सुट्टी असतानाही सकाळपासून नगरसचिव विभागाची यंत्रणा नगरसेवकांकडून (PMC Corporators) यादी मागविण्यासाठी ‘फोन’वर बसली होती. तर नगरसेवकही ‘लॉटरी’ लागली या आर्विभावात कार्यकर्त्यांमार्फत चार ते पाच कोटी रुपये कामांची ‘स’ यादी स्थायी समिती अध्यक्षांकडे पाठवत होते. या याद्या टायपिंग करण्याचे कामही हातोहात सुरू होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

परंतू यामुळे उलट सुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. १४ मार्चला नगरसेवकांचे पद संपुष्टात येत आहे. स्थायी समितीने अंदाजपत्रक तयार करण्याचे अधिकार अद्याप स्थायी समिती अध्यक्षांना दिलेले नाहीत. हे अधिकार दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष त्यांचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर करतात. सर्वसाधारण सभा (PMC GB) बोलविण्याची सूचना सुट्टीचे दिवस वगळून किमान सात दिवस अगोदर काढावी लागते. ही सूचनाच अद्याप काढण्यात आलेली नसल्याने नगरसेवकपद संपुष्टात येण्यापुर्वी सभाच होणार नाही, हे स्पष्ट आहे.

सध्या चार सदस्यीय प्रभाग रचना आहे. आगामी निवडणुक त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे.
त्यामुळे आताच्या नगरसेवकांनी ‘स’ यादीसाठी सुचविलेली कामे नवीन प्रभाग रचनेत तांत्रिकदृष्टया करता येणार नाहीत.
दर पाचवर्षांनी होणार्‍या निवडणुकीमध्ये जुने जेमतेम ३० ते ३५ टक्केच नगरसेवक निवडूण येतात.
त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आगामी अंदाजपत्रकात केलेली तरतूद वापरताच येणार नाही, अशा अनेक तांत्रिक गोष्टी आहे.
त्यामुळे सलग चवथ्यांदा स्थायी समिती अध्यक्षपद मिळालेले हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी अंदाजपत्रक सादर करण्याचा ‘चंग’ कशासाठी बांधला आहे.
याबाबत नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Corporation | PMC Standing Committee Chairman Hemant Rasne has promised to present the budget for 2022-23

हे देखील वाचा :

Mini Portable AC | जोरदार विक्री होतेय 400 रुपयांच्या छोट्या AC ची ! मिनिटभरात खोली करतो थंडगार

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेवर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक ! पर्यावरण प्रेमींना प्रकल्पाचे सादरीकरण करून त्यांच्या सूचनांचाही अभ्यास करावा – जलसंपदा मंत्र्यांचे पालिका प्रशासनाला आदेश

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांकडून आणखी एक गौप्यस्फोट; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार ?

Related Posts