IMPIMP

Pune Corporation | वीज बचतीसाठी पुणे महापालिका नेमणार स्वतंत्र कंपनी; विद्युत विभागाने निविदा मागविल्या

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | महापालिकेचा वीज वापर वाढत असताना विजेची व पर्यायाने खर्चाची बचत करण्यासाठी पुणे महापालिका (Pune Corporation) विकास आराखडा तयार करणार आहे. सध्याची व्यवस्था, यंत्रसामुग्रीचा अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विकास आराखडा तयार करण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ संस्था नेमण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाच्यावतीने निविदा काढण्यात आली आहे.

पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ सव्वा पाचशे चौ.कि.मी.च्या पुढे गेले आहे.
साहजिकच पाणी पुरवठा, सार्वजनिक ठिकाणची प्रकाश व्यवस्था, महापालिकेच्या कार्यालयांमधील विजेचा वापर वाढत आहे.
सार्वजनिक ठिकाणची प्रकाश व्यवस्था प्रामुख्याने पथदिव्यांच्या विज वापराचे मुल्यमापन करणे यासाठी स्वतंत्र कंपनी यापुर्वीच नेमली आहे.
तसेच महापालिका भवन व अन्य कार्यालयातील वीज बचतीसाठी महापालिकेने यापुर्वीही वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने एलईडी दिव्यांचा वापर तसेच वीज दिवे ऍटोमॅटीक चालू बंद होण्याच्या यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

परंतू शहराच्या वाढत्या क्षेत्रफळासोबतच वीज वापर वाढत जाणार असल्याने जास्तीत जास्त विजेची आणि खर्चाची बचत करण्यासाठी महापालिका
(Pune Corporation) प्रशासनाने जाहिर निविदा काढून स्वतंत्र कंपनीची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
या कंपनीने सुचविलेल्या उपाययोजनामधून जेवढी वीज बचत अर्थात पैशांची बचत होईल, त्यातूनच या कंपनीला मोबदला देण्यात येईल, अशा पद्धतीची ही योजना आहे.

या योजनेअंतर्गत सध्याच्या वीजयंत्रणेचा अभ्यास करून सुधारीत विकास आराखडा तयार करणे.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वीज बचत योजना सुचविणे, या योजनेसाठी येणारा खर्च, करावे लागणारे बदल आणि होणारे फायदे आराखड्यात देणे.
या प्रकल्पाचा खर्च उचलणे व त्याच्या आर्थिक परताव्या बाबतीतही आराखड्यात स्पष्टता देणे, प्रकल्पाची देखभाल, दुरूस्ती कणे व संबधित महापालिका अभियंते व कर्मचार्‍यांना माहिती व प्रशिक्षण देणे.
वीज बिलातील युनिट बचतीनुसार प्रकल्प खर्च वसुल करताना महापालिकेचे (Pune Corporation) आर्थिक नुकसान होणार नाही.
अशा पद्धतीने प्रकलप कालावधी ठरविणे आदी अटी यासाठी घालण्यात आल्या आहेत.
अशी माहिती विद्युत विभागाचे शहर अभियंता श्रीनिवास कंदुल (Electrical Department City Engineer Srinivas Kandul) यांनी दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation to hire an independent company to save electricity; The electricity department invited tenders

हे देखील वाचा :

Coronavirus | मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात पुन्हा कोरोनाची ‘एन्ट्री’

Nawab Malik | नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप; म्हणाले…

Pune Crime | T-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यावर बेटींग घेणाऱ्या दोघांना अटक; 4.65 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 32 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts