IMPIMP

Pune Corporation | पुणे मनपा खाजगी जागेवरील लसीकरण केंद्रांचे स्थलांतर करणार ! लसीकरण केंद्रांवरील मंडप काढून टाकण्याचे आदेश

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  लसीकरणासाठी भाडेतत्वावर (Pune Corporation) घेण्यात आलेली केंद्रे बंद करण्याचा तसेच लसीकरण केंद्रांवर सावलीसाठी उभारण्यात आलेले मंडप काढून टाकून सर्व लसीकरण केंद्र महापालिकेच्या (Pune Corporation ) मालकिच्या जागेमध्ये स्थलांतरीत करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देशभरात १६ जानेवारीला कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू झाली. कोरोनाच्या संसर्गानंतर जवळपास दहा महिने ठप्प झालेले सर्व व्यवहार सुरळीत होण्याच्या दिशेने पहिले पाउल म्हणून लसीकरणाने काहीसा दिलासा मिळाला.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक व कोरोना वॉरीअर्सचे लसीकरण करण्यात आले.
तर दुसर्‍या टप्प्यात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले.
दरम्यान आपल्या भागात लसीकरण केंद्र असावे यासाठी सर्वच नगरसेवक (corporator) सरसावले.

यामुळे महापालिकेने शहरातील (Pune Corporation) महापालिका रुग्णालयांप्रमाणेच लसीकरणासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध होईल अशा ठिकाणी अर्थात महापालिकेच्या शाळा, वास्तू,समाज मंदिरे (Samaj Mandir) तसेच ज्या परिसरात महापालिकेची वास्तू उपलब्ध नाही त्याठिकाणी खाजगी जागा भाडेकराराने घेउन लसीकरण केंद्र सुरू केली.

लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी तसेच कोरोना नियमावलीमुळे नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवून उभे राहाण्यास जागा मिळावी यासाठी बहुतांश लसीकरण केंद्रांच्या बाहेर मंडप उभारण्यात आले आहेत.
तर पुढील टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध करून देण्यासोबतच विशेष मोहीमा राबवून कॅम्प घेउन समुहाने लसीकरण करण्यात आले.
कोरोना संसर्गामुळे देशात रेडझोन (Red Zone) म्हणून कुख्याती मिळालेल्या पुणे शहराने लसीकरणात राज्यात आघाडी घेत सर्वाधीक लसीकरण केले आहे.
त्यामुळे अलिकडे लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्याही आटोक्यात आल्याने शहरातील सर्व निर्बंध हटले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, लसीकरण मोठ्याप्रमाणावर झाल्याने महापालिकेने लसीकरण केंद्रावर भाडेतत्वार घेतलेले मंडप काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच ज्या ठिकाणी खाजगी जागेत , भाडेतत्वावर लसीकरण केंद्र (vaccination center)सुरू केली होती त्यांचे स्थलांतर महापालिकेच्या वास्तुंमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे मंडप अथवा जागेच्या भाड्यावर होणारा खर्चही आटोक्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title :  Pune Corporation | Pune Municipal Corporation to relocate immunization centers on private land! Order to remove pavilions at vaccination centers

हे देखील वाचा :

Pune News | पुण्यातील मार्केट यार्ड सोमवारी बंद !

PM Kanya Ashirwad Yojana | सरकार पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजनेंतर्गत मुलींना खरंच 2000 रुपये देत आहे का? जाणून घ्या सविस्तर

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts