IMPIMP

Pune Corporation | महापालिकेच्या आरोग्य योजनांचे ऑडीट करणार – पुणे मनपा स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिकेने (Pune Corporation) जागा व अन्य सुविधा पुरविलेल्या खाजगी रुग्णालयांतील राखीव बेडस्ची माहिती सर्वसामान्यांना समजावी यासाठी ती वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे काम महिन्याभरात मार्गी लावण्यात येईल. तसेच महापालिकेच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांच्यावर अंशदायी योजनेअंतर्गत करण्यात येणारे उपचार महापालिकेच्या (Pune Corporation) रुग्णालयांमध्येच (PMC Hospital) करण्यात यावेत यासाठी प्राधान्य देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती (PMC Standing Committee) अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिकेच्यावतीने बाणेर येथे दोन नवीन रुग्णालये (PMC Baner Hospital) उभारण्यात आली आहेत. तसेच नुकतेच वारजे आणि बाणेर – बालेवाडी (Baner Balewadi) येथे अनुक्रमे मल्टिस्पेशालिटी व कॅन्सर हॉस्पीटल (Multispeciality and Cancer Hospital) उभारण्याची प्रक्रिया सुरू असून धनकवडी येथील ट्रक टर्मिनन्सच्या जागेवरही मोठे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. डॉ. नायडू रुग्णालयाच्या जागेवर मेडीकल कॉलेज व रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच पालिकेने यापुर्वी ह्दयरोगावरील उपचारासाठी औंध येथील एम्स आणि कमला नेहरू रुग्णालयामध्येही व्यवस्था केली आहे. तर बोपोडी येथे डोळ्यांवरील उपचारांसाठीचे रुग्णालय आहे. यासोबतच महापालिकेने (Pune Corporation) शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयांना जागा व अन्य सुविधा दिल्याने त्याठिकाणी महापालिकेकडून पाठविण्यात येणार्‍या रुग्णांसाठी राखीव बेडस् ठेवण्यात आले असून तेथे सी.जी.एच.एस. Central Government Health Scheme (CGHS) दराने उपचार केले जातात.

यानंतरही महापालिका शहरी गरीब योजनेअंतर्गत दरवर्षी अल्प उत्पन्न गटातील रुग्णांवर ५० कोटी रुपयांहून अधिक खर्च करते. तसेच महापालिका, शिक्षण मंडळ, पीएमपीएमएलचे अधिकारी व कर्मचारी, आजी- माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबियांवर अंशदायी योजनेअंतर्गत १०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करते. तसेच राज्य शासनाच्या ससून आणि औंध उरो रुग्णालयातही शासनाच्या योजनेतून सर्वसामान्यांवर उपचार केले जातात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकीकडे महापालिकेकडे पैसे नसल्याने खाजगी भागीदारीतून हॉस्पीटल उभारणी व ते चालविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव सादर केले
जात असताना महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या आरोग्य सुविधांचे ऑडीटच केले जात नाही.
त्यामुळे महापालिका ज्या उपचार सुविधा पुरवितात, त्यासाठी परत पैसेही खर्च केले जात आहेत.
या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (PMC Standing Committee Chairman Hemant Rasne) यांना विचारले असता,
ते म्हणाले की येत्या काळात महापालिकेच्या सर्व आरोग्य सुविधांचे ऑडीट करण्यात येईल.
सर्व योजनांमधील सहभागी नागरिक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांवरील उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयातच प्राधान्य राहील.
महापालिकेच्या रुग्णालयात संबधित उपचार सुविधा नसतील तरच त्यांचा अन्य योजनांसाठी विचार करण्यात येईल.
तसेच महापालिकेकडून उपचारासाठी पाठविण्यात येणार्‍या रुग्णांसाठीच्या बेडस्ची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर अपडेट ठेवण्यात येईल.
यासर्व बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र सेल निर्माण करण्यात येईल.

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation will audit the health plans of the PMC Standing Committee Chairman Hemant Rasne

हे देखील वाचा :

Sangli Crime | सांगलीत महिला पोलीसाच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

7th Pay Commission | खुशखबर ! PMPML च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

Uday Samant | पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण 14 फेब्रुवारीला होणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती

CBSE Term 2 Exam Date | सीबीएसई टर्म 2 परीक्षेच्या तारखेची घोषणा, पहा CBSE ची नोटिस

Related Posts