IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून डायलेसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

by nagesh
Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | कोंढवा येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहात डायलेसिसचे उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (pmc standing committee chairman hemant rasne) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Pune Corporation)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रासने म्हणाले, मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहात दहा खाटांचे डायलेसिस उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक डायलेसिस मशिन, बेड, मॉनिटर आदीची खरेदी आणि प्रकल्प चालविण्यासाठी सुमारे १४ लाख ६५ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

मेकॅनिकल सेल्फ प्रोपेल्ड रोड स्वीपर चालविण्यासाठी कंपनीची नियुक्ती
मेकॅनिकल सेल्फ प्रोपेल्ड रोड स्वीपर चालविण्यासाठी ग्रीनव्हायरो इन्न्फ्राटेक या कंपनीच्या सर्वात कमी दरातील निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, नॅशनल क्लन एयर प्रोग्रम (एनसीएपी) अंतर्गत पुणे महापालिकेला हे मशिन प्राप्त झाले आहे. ते चालविणे आणि त्याची देखभाल करण्यासाठी पंचाहत्तर लाख एक्कावन्न हजार रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. (Pune Corporation)

घनकचर्‍याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी यंत्रणा
घनकचर्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या पाच विभागांत बसविण्यात आलेली यंत्रणा, कचरा खेचून घेणार्या मशिन आणि टिपर चालविणे आणि त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, घनकचरा व्यवस्थापनासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. ती चालविणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी आठ कोटी तीन लाख रुपयांच्या कमी दराने आलेल्या निविदेला मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेद्वारे पुढील चार वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोग्य विभागातील ३१ डॉक्‍टरांना मुदतवाढ
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणार्या तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना म्हणून वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचार्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुष विभागासाठी बीएएमएस आणि बीएचएमएस असे प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी, दोन दंतशल्यचिकित्सक आणि बीएएमएस पदवी संपादन केलेल्या २५ अधिकारी अशा ३१ डॉक्‍टरांना स्थायी समितीने मुदवाढ दिली आहे.

ती’ महिला स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी यंत्रणा
शहरात महिलांसाठी असणार्या ‘ती’ महिला स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी यंत्रणा उभारुन देखभाल दुरुस्तीसाठी साराप्लास्ट या संस्थेशी पुढील अकरा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, पीएमपीएमएलच्या वापरात नसणार्या बसेसचे रुपांत महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे.
या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन, टॉयलेट सिट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर,
जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

रासने म्हणाले, या बसेसमध्ये दोन विभाग असून एका विभागात टॉयलेट आणि वॉश बेसिन आहे.
दुसर्या विभागात चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, शीतपेय यांची विक्री, जाहिरात, पे अण्ड यूज,
भाडेतत्वावरील उत्पन्न घेऊन त्याद्वारे देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
पे अण्ड यूजद्वारे पाच रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सिंध सोसायटी-औंध, संभाजी पार्क, सिमला ऑफीस, शनिवारवाडा, ग्रीन पार्क हॉटेल-बाणेर,
आनंद नगर-सिंहगड रस्ता, छत्रपती शिवाजी उद्यान-बोपोडी, आरटीओ-फुले नगर, लोहगाव बसस्टॉप,
संविधान चौक-विश्रांतवाडी या अकरा ठिकाणी ‘ती’ महिला स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्वस्त दरातील वीज खरेदीसाठी कंपनी स्थापन करण्यास मान्यता
एनर्जी इफीशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील
कंपनीची उपकंपनी असणार्या कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस कंपनीबरोबर (सीईएसएल) स्पेशल पर्पज व्हेरईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन क…

Web Title :- Pune Corporation | Purchase of equipment for dialysis treatment from Pune Municipal Corporation

हे देखील वाचा :

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 59 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

Related Posts