IMPIMP

Pune Corporation | पुण्यातील रस्ते खोदाईनंतरच्या दुरूस्तीच्या कामांसाठी पुन्हा कोट्यवधीच्या निविदा; महापालिकेचा ‘आंधळ दळतयं कुत्रं पीठ खातयं’चा कारभार

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | पुणे शहरात ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबल, एम.एन.जी.एल. साठी (MNGL) रस्ते खोदाई केल्यानंतर रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी वरवरची दुरूस्ती केल्याने जवळपास सर्वच रस्ते असमतल आणि खड्डेमय झाले आहेत. हे खड्डे दुरूस्तीसाठी पुन्हा नव्याने निविदा (PMC Tender) काढून पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे कितीही ‘पारदर्शकतेचा’ गाजावाजा केला तरी ‘आंधळ दळतयं कुत्रं पीठ खातयं’ असाच कारभार सुरू (Pune Corporation) असल्याचे स्पष्ट होत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) मागील दीड वर्षामध्ये सुमारे २२० कि.मी.चे रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. प्रामुख्याने चोवीस तास पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज लाईन, इंटरनेट व वीज केबल आणि एम.एन.जी.एल. गॅस पाईपलाईनच्या (MNGL Gas Pipeline) कामांसाठी ही खोदाई करण्यात आली आहे. विशेष असे की पावसाळ्यात खोदाईचे काम बंद ठेवले जात असतानाही यावर्षी पावसाळ्यातही अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईनची कामे मोठ्याप्रमाणावर सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर खोदाईचा राडारोडा, खड्डेमय रस्ते आणि त्यातून संथपणे होणारी वाहतूक असेच चित्र पाहायला मिळाले. प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनची संधी साधत वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली ड्रेनेज लाईन तसेच चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईन्स, मीटर बसविण्याची कामे करण्यात आली.

यापैकी केवळ चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईनच्या कामांसाठी खोदाई केल्यानंतर रिइंन्स्टीटमेंटच्या कामाची जबाबदारी ही या योजनेचे काम करणार्‍या एल.एन्ड टी. या कंपनीची आहे. तसेच मध्यवर्ती भागातील ड्रेनेज लाईनचे काम केलेल्या ठेकेदाराकडेच ही जबाबदारी आहे. परंतू केबल कंपन्या, एम.एन.जी.एल. ने केलेल्या कामांसाठी खोदाई व नंतर रस्ता दुरूस्तीचे पैसे हे महापालिका त्या कंपन्यांकडून आगाउ भरून घेते. नंतर महापालिका स्वतंत्र ठेकेदार नेमून रस्ते दुरूस्ती करून घेते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्त्यावर चोवीस तास पाणी पुरवठा व ड्रेनेजची कामे करणार्‍या ठेकेदार कंपन्यांनी रिइंन्स्टीटमेंटची कामे केली आहेत. परंतू अनेक ठिकाणी ती असमतल व खचल्याने खड्डे पडले आहेत. तर शहराच्या अन्य भागात महापालिकेने निविदा काढून नेमलेल्या ठेकेदाराने रिइंन्स्टीटमेंटची कामे केली आहेत. तेथे देखिल अशीच परिस्थिती आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती भागात काम झालेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे करण्यासाठी काढलेल्या 8 कोटी रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तसेच आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शहराच्या विविध भागातील रिइंन्स्टीटमेंटच्या कामाच्या सुमारे 4 कोटी रुपयांच्या 6 ते ७ सात निविदा मंजुर करण्यात आल्या आहेत. अवघ्या काही दिवसांपुर्वीच रिइंन्स्टीटमेंट केलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि पुन्हा रिइंन्स्टीटमेंटची कामे काढली आहेत. वास्तविकत: विहीत मुदतीत केेलेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास त्याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी ही संबधित ठेकेदाराचीच असते. असे असताना पुन्हा नवीन निविदा काढून कोणाचे ‘भले’ करण्यात येत आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर येत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ठेकेदारांबद्दल प्रशासनाला कडक सूचना – हेमंत रासने

खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यांच्या रिइंन्स्टीटमेंटच्या निकृष्ट कामांबद्दल आज स्थायी समितीमध्ये प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला आहे.
येत्या आठवड्याभरात महापालिका आयुक्त, पथ विभाग, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख,
ठेकेदार कंपन्या अशी संयुक्त बैठक बोलावून प्रत्येकाची जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यासोबतच नागरिकांना आणि वाहतुकीला त्रास होणार नाही
अशापद्धतीने पुढील कामांचे वेळापत्रक तयार करावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

– हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष
(standing committee chairman hemant rasane)

Web Title :- Pune Corporation | Tenders of crores of rupees again for post-road repair work in Pune; Municipal Corporation’s ruling party bjp management

हे देखील वाचा :

Pune Police Crime Branch | कोकेन बाळगणाऱ्या 2 नायजेरियन नागरिकांना अटक, 2 लाखाचे कोकेन जप्त

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 111 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

NCP Prashant Jagtap | सिरिंजच्या तुटवड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सत्ताधाऱ्यांवर ‘हल्लाबोल’

Related Posts