IMPIMP

Pune Corporation | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महापालिकेच्या 63 कर्मचार्‍यांचे वारस अद्याप मदतीपासून ‘वंचित’; तातडीने वारसांना मदत द्यावी – पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियनची प्रशासनाकडे मागणी

by nagesh
Pune Corporation | The heirs of 63 municipal employees who died due to corona are still 'deprived' of help; Immediate help to heirs - PMC Employees Union demands administration

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महापालिकेच्या (Pune Corporation) 88 पैकी 25 कर्मचार्‍यांच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली आहे. उर्वरीत कर्मचार्‍यांचे वारस प्रतिक्षेत असुन, सात कंत्राटी कामगारांच्या वारसांना अद्याप सदर रक्कम मिळाली नाही. यासंदर्भात पी.एम.सी. एम्प्लॉईज युनियनने (PMC Employees Union) महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोना काळात कर्तव्य बजावताना दिवंगत झालेल्या महापालिकेच्या (Pune Corporation) कर्मचार्‍यांच्या (pmc employee) नातेवाईकांना विम्याची रक्कम वाढवून मिळावी अशी मागणी त्यांनी यानिवेदनात केली आहे. युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडीक, कार्याध्यक्ष आशिष चव्हाण यांनी यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांना निवेदन दिले आहे. कोरोनाच्या कालावधीत शहरात लॉकडाऊन लागु केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रस्त्यावर उतरून स्वच्छतेपासून आरोग्यपर्यंतच्या सेवा देणार्‍या महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. यात आजपर्यंत एकूण 88 जणांचा मृत्यू झालेला आहे. यात 81 कायम सेवक व 7 कंत्राटी कर्मचार्‍यांचा सामावेश आहे. महापालिकेने कायम सेवेतील मृत कर्मचारी व अधिकर्‍यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 50 लाख आणि महापालिकेच्या कामगार कल्याण निधी मार्फत 50 लाख रुपये थेट मदत किंवा घरातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरी व 25 लाख रुपये सुरक्षा कवच योजनेची घोषणा केलेली आहे.

मृत झालेल्या कर्मचार्‍यांचे प्रस्ताव केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे पाठविले असता.
ज्यांचा मृत्यू कोविड वॉर्डमध्ये काम करताना झाला केवळ अशा कर्मचार्‍यांनाच 50 लाखाची मदत दिली जाते असे सांगत मदत नाकारली आहे.
अखेर महापालिका स्तरावर मृत सेवकांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये रोख व नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारने ऑगस्ट महीन्यात घेतलेल्या निर्णयानुसार आरोग्य सेवा संबंधित कर्मचार्‍यांव्यतिरिक्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अन्य कर्मचारी ज्यांचा कोविडशी संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेला आहे, अशा कर्मचार्‍यांना 50 लाख इतके सानुग्रह साहाय्याची योजना लागू करण्यात आलेली आहे. तसेच या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे. अ व ब वर्ग महापालिकांनी रु.50 लाख सानुग्रह साहाय्याची योजना त्यांच्या स्वनिधीतून राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानिर्णयानुसार कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना सानुग्रह साहाय्याची/विम्याची रक्कम वाढवून आणि लवकर मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Pune Corporation | The heirs of 63 municipal employees who died due to corona are still ‘deprived’ of help; Immediate help to heirs – PMC Employees Union demands administration

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी मिळणार? महापालिका प्रशासन म्हणते…

Postal Life Insurance | पोस्ट विभागाने लाँच केला नवीन डिजिटल पोस्टल लाईफ इन्श्युरन्स बाँड, पेमेंट करणे होणार सोपे

Gold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर

Related Posts