IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिका अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी ई-मोटारी भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी

by nagesh
Pune Corporation | The proposal to lease e-car for Pune Municipal Corporation officers and office bearers has finally been approved

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Corporation | पालिकेचे अधिकारी व पदाधिकार्‍यांसाठी पर्यावरणपूरक ३८ पर्यावरणपूरक मोटारी भाडेतत्वावर घेण्याचा अडीच महिने प्रलंबित प्रस्ताव अखेर आज स्थायी समितीमध्ये (PMC standing committee) मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर करताना मोटारी पुरविणार्‍या कंपनीकडील चालकांऐवजी महापालिकेचेच (Pune Corporation) चालक या मोटारी चालवतील अशी उपसूचना देउन हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

टाटा निक्सॉन (tata nexon)कंपनीच्या ३८ ई मोटारी भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. या मोटारींमुळे महापालिकेला (Pune Corporation) आठ वर्षासाठी २३ कोटी २८ लाख रुपये खर्च येणार असून दरवर्षी टप्प्याटप्प्याने हे पैसे द्यायचे आहेत.
यामुळे महापालिकेची दरमहा १ लाख ७७ हजार रुपयांची बचत होणार असल्याचे प्रशासनाने जुलैमध्ये स्थायी समितीकडे दिलेल्या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले होते. यामध्ये संबधित कंपनीचेच चालक
या मोटारींवर नेमले जाणार होते.
परंतू या चालकांऐवजी महापालिकेकडील चालकच या मोटारींवर नेमण्याची उपसूचना देउन प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

महापालिकेकडे अधिकारी (PMC Officers) आणि पदाधिकार्‍यांसाठी ऍम्बेसिडर, इंडिका, इंडिगो, मांझा, टोयाटो अल्टीस, सियाझ,
टाटा टियागो, कोरोला, ईटीओस आणि स्विफ्ट डिझायर या पेट्रोल व डिझेलवर धावणार्‍या १०७ मोटारी आहेत. तर भाडेतत्वावरील जीप,
इको व्हॅन आणि इंडिका या कंपनीच्या ८० मोटारी आहेत.
महापालिकेच्या मालकिच्या मोटारींना दरमहा सरासरी १७५ लिटर डिझेल अथवा पेट्रोल लागते.
तर ऍम्बेसिडर वाहनांना सरासरी २०० लि. पेट्रोल लागते.
ताफ्यामध्ये पेट्रोलवर धावणार्‍या ऍम्बेसिडर गाड्यांची संख्या सर्वाधिक अर्थात ३९ इतकी आहे.
यापैकी १६ ऍम्बेसिडरचे आयुष्यमान १० ते १५ वर्षे असून २३ ऍम्बेसिडरचे आयुष्यमान आणखी ५ ते १० वर्षे आहे.
तर अलिकडेच ७ इंडिका मोटारींचीही खरेदी केली असून त्यांचे आयुर्मान १५ वर्षांपेक्षा अधिक आहे.
तर ३३ सियाझ, टियागो आणि स्विफ्ट डिझायर गाड्यांचे आयुर्मान ५ वर्षांपेक्षा कमी राहीले आहे.
त्यामुळे येत्या पाच वर्षांच्या आतमध्ये या मोटारी मोडीत काढाव्या लागणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

इलेक्ट्रीक मोटारींमुळे पांरपारिक इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणाची हानी कमी होण्यासही मदत होणार आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. कडे महापालिकेने ई मोटारी भाडेतत्वावर पुरविण्यासाठी विचारणा केली होती.
त्यानुसार मे. एनर्जी ईफिसिएन्सी लि. ने महापालिकेला टाटा नेक्सॉन कंपनीच्या ई मोटारी चालकासह ८ वर्षे भाडेतत्वावर देण्याचे दरपत्रक दिले.
८ वर्षांनंतर करार संपल्यानंतर मोटारीच्या एमआरपीच्या ५ टक्के रक्कम भरल्यास त्या मोटारी महापालिकेलाच मालकीहक्काने
देण्याचेही कंपनीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
३८ वाहनांसाठी चालकासह २३ कोटी २८ लाख ८८ हजार रुपये खर्च येणार असून तो ८ वर्षे टप्प्याटप्प्याने द्यायचा आहे.

पेट्रोल व डिझेलवरील वाहनासाठी प्रत्येक महिन्याला ६३ हजार रुपये खर्च येत असून टाटा नेक्सॉन ई मोटारीसाठी ५८ हजार ३५० रुपये खर्च होणार आहे.
प्रत्येक मोटारीमागे सरासरी ४ हजार ६५५ रुपये बचत होणार असून ३८ वाहनांसाठी दरमहा १ लाख ७७ हजार रुपये बचत होणार आहे.
पुढील आठ वर्षांचे दायित्व तसेच कंपनीसोबत करार करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

Web Title :  Pune Corporation | The proposal to lease e-car for Pune Municipal Corporation officers and office bearers has finally been approved

हे देखील वाचा :

Multibagger Stock | 4 रुपये 81 पैशावरून 787.40 रुपयावर पोहचला हा शेयर ! 1 लाख झाले 1.63 कोटी रुपये, आली 163 पट जबरदस्त ‘तेजी’

IPP Bank Recruitment | इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ‘या’ पदांसाठी भरती, 2.6 लाख रूपयांपर्यंत पगार, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | सुप्रसिध्द अमर बिल्डर्सची 5 कोटींची फसवणूक ! अ‍ॅड. पराग देशपांडेविरुद्ध गुन्हा; धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नावाचा केला गैरवापर

Related Posts