IMPIMP

Pune Corporation | राज्य सरकारने समाविष्ट 34 गावांतील जीएसटी व मुद्रांक शुल्कचे 1100 कोटी रुपये द्यावेत; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची CM उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

by nagesh
Pune Corporation | The state government should pay Rs 1100 crore for GST and stamp duty in 34 villages covered; Standing Committee Chairman Hemant Rasne's demand towards CM Uddhav thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Corporation | राज्य सरकारने समाविष्ट ३४ गावांतील महापालिकेचे (Pune Corporation) जीएसटी, मुद्रांक शुल्काचे एकुण अकराशे कोटी रुपये थकविले आहे अशी माहीती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) यांनी दिली. हे पैसे मिळावेत यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

स्थायी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परीषदेत रासने यांनी यासंदर्भात माहीती दिली. राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या वाट्याचे पैसे येणे बाकी असल्याचा दावा केला.
महापालिकेच्या हद्दीत चार वर्षापुर्वी अकरा गावे आणि नुकतीच तेवीस गावे समाविष्ठ झाली आहे.
या गावातील जीएसटी आणि मुद्रांक शुल्काच्या (Stamp Duty) पंचवीस कोटी रुपयांची राज्य सरकारकडे थकबाकी आहे.
मुद्रांक शुल्क विभागाकडून वसुल केल्या जाणार्‍या मुद्रांक शुल्काच्या एक टक्का रक्कम ही महापालिकेला दिली जाते.
राज्य सरकारने ऑक्टोबर २०१९पासून सप्टेंबरअखेरपर्यंत एकुण ३३३ कोटी ७४ लाख रुपये थकविले आहेत.

जीएसटी (GST) जुलै २०१७ पासुन लागू झाला आहे. राज्यसरकारने एकुण ७३६ कोटी २० लाख रुपये थकविले आहे.
यामध्ये यापुर्वी समाविष्ट झालेल्या अकरा गावांतील १७ कोटी ८१ लाख रुपये, नुकतेच समाविष्ट केलेल्या २३ गावांतील ९ कोटी ८१ लाख रुपयांच्या जीएसटीचा समावेश आहे.
अशी माहीती रासने यांनी दिली. (Pune Corporation)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज्यसरकारला जीएसटीचा वाटा हा केंद्र सरकारकडून मिळत आहे, परंतु या जीएसटीच्या रक्कमेतील महापालिकेचा वाटा राज्य सरकारने थकीत ठेवला आहे.
तर मुद्रांक शुल्क हे राज्य सरकारच वसुल करीत असुन, ही रक्कम त्यांच्याकडे असुनही ती देखील वेळेत मिळत नसल्याची खंत रासने यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar),
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) इतरांना निवेदन देणार असल्याचे रासने यांनी नमूद केले.

Web Title : Pune Corporation | The state government should pay Rs 1100 crore for GST and stamp duty in 34 villages covered; Standing Committee Chairman Hemant Rasne’s demand towards CM Uddhav thackeray

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Airport | …म्हणून पुण्यातील लोहगाव विमानतळ ‘या’ तारखेपासून 15 दिवस बंद राहणार

Palghar ZP By-Election | पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा थेट शिवसेनेला पाठिंबा; राजकीय वर्तुळात खळबळ

Related Posts