IMPIMP

Pune Court | 2.40 कोटीचे फसवणूक प्रकरण ! उद्योजक गौतम पाषाणकर, त्यांची मुलगी रीनल पाषाणकर यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला

by nagesh
Pune Court | 2.40 crore fraud case! Entrepreneur Gautam Pashankar and his daughter Renal Pashankar were denied bail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Court | ग्राहकाने सदनिका खरेदीसाठी पूर्ण पैसे भरुनही त्याचा वेळेत ताबा दिला नाही, तसेच सदनिका खरेदी व्यवहारात दोन कोटी ४० लाख रुपये परत मागितल्याप्रकरणात उद्योजक गौतम पाषाणकर (gautam pashankar) आणि त्यांची मुलगी रीनल पाषाणकर (rinul pashankar) यांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर (Sessions Judge V. D. Nimbalkar) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या प्रकरणी गौतम पाषाणकर, रीनल पाषाणकर आणि दिप विजय पुरोहीत Deep Vijay Purohit (रा. कल्याणीनगर) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र पंडितराव पाटील Narendra Panditrao Patil (वय ४२, रा. पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पाटील यांनी प्रोक्झिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन खराडी येथील बांधकाम प्रकल्पातील सी इमारतीमध्ये “पी 101” व “पी 102” अशा दोन सदनिका खरेदी करण्याचे निश्चित केले होते.
त्यांच्यात ठरल्याप्रमाणे दोन कोटी ८७ लाख रूपयांचा करारनामा ही झाला होता.
या व्यवहारापोटी पाटील यांच्याकडुन तीन कोटी ४० लाख रुपये घेण्यात आले.
पैसे घेऊनही त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही, तसेच त्याचे नोंदणीकृत दस्तही केले नाहीत.

याउलट “पी १०२” सदनिकेचे खरेदी खत सुशील झोररतर्फे कुलमुखत्यारपत्र मनीष गोरद यांना देण्यात आले, तर “पी १०१” सदनिका गणेश शिंदे यांच्या नावे करण्यात आली.
या प्रकरणी फिर्यादी यांनी जाब विचारला, तेव्हा फिर्यादीस पाषाणकर यांच्या जंगली महाराज रस्ता (jangli maharaj road) येथील कार्यालयात बोलविण्यात आले.
तेथे त्यांना पाषाणकर व त्यांच्या नोकरांनी पाटील यांना जबर मारहाण केली.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गौतम पाषाणकर आणि रीनल पाषाणकर यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
त्यास सरकारी वकील राजेश कावेडीया (Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी विरोध (Pune Court) केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Pune Court | 2.40 crore fraud case! Entrepreneur Gautam Pashankar and his daughter Renal Pashankar were denied bail

हे देखील वाचा :

Pravin Darekar | आसमानी संकटाने शेतकरी हवालदील, तरीही सरकारला प्रतीक्षा अहवालाची – प्रवीण दरेकर

Electric two-wheeler | अँटी-थेफ्ट फीचरची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये धावते 160 किलोमीटर, जाणून घ्या किंमत

Air Marshal V R Chaudhari | गौरवास्पद ! महाराष्ट्रातील नांदेडचे सुपुत्र व्ही. आर. चौधरी हवाई दलाच्या प्रमुखपदी

Related Posts