IMPIMP

Pune Court | गारवा हॉटेलच्या मालकाच्या खून प्रकरणात महिला आरोपीस जामीन

by nagesh
Kolhapur Crime | cousin raped by breaking into the house in broad daylight 30 year old nephew sentenced to 10 years kolhapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Court | उरुळी कांचन (uruli kanchan) येथील गारवा हॉटेलच्या (hotel garva) मालकाच्या खून प्रकरणात मोक्का अंतर्गत (MCOCA Act) कारवाई केलेल्या आरोपी महिलेला न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Court Judge S. R. Navander) यांनी हा आदेश (Pune Court) दिला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काजल चंद्रकांत कोकणे असे जामीन मंजूर केलेल्या महिलेचे नाव आहे. गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे (ramdas akhade) हे हॉटेलसमोर बोलत असताना अचानकपणे एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. त्यांना रूग्णालय दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान बाळासाहेब खेडेकर आणि निखिल खेडेकर यांना अटक करण्यात आली होती. तपासामध्ये आरोपींनी निलेश मधुकर आरते याला सुपारी देऊन खून घडवून आल्याचे निष्पन्न झाले होते. हा खून हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकूण दहा आरोपींना अटक केली होती. त्यापैकी प्रमुख आरोपी निलेश आरते याची पत्नी काजल चंद्रकांत कोकणे हिला 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तिच्यावर शस्त्र लपविण्याचा गुन्हा दाखल (Pune Court) करण्यात आला आहे.

आरोपी महिलेचा या गुन्ह्याच्या टोळीशी काहीही संबंध नसून, आरोपीला खोट्या गुन्हयात अडकवण्यात आले आहे. आरोपी महिला ही आठ महिन्यांची गरोदर आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. तो न्यायालयाने ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपी महिलेची मुक्तता केली. ॲड. सचिन झालटे पाटील (Adv. Sachin Zalte Patil) व ॲड. कल्पेश राम आढाव (Adv. Kalpesh Ram Adhav) यांच्यामार्फत तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

Web Title :- Pune Court | Bail granted to woman accused in murder case of Garva hotel owner

हे देखील वाचा :

Income Tax Department | देशातील कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा ! प्रलंबित कर प्रकरणे निकाली काढण्याची अंतिम मुदत वाढवली, जाणून घ्या नवीन तारीख

Gold Price Today | वाढीनंतर सुद्धा सोने 45 हजार रुपयांच्या जवळ, चांदी झाली महाग; जाणून घ्या नवीन दर

Pune Crime | परदेशी चलनाच्या आमिषाने तरुणाला 3 लाखांचा गंडा; केलं ‘हे’ कृत्य

Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार

Related Posts