IMPIMP

Pune Crime | केएफसीची फ्रेंचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांना गंडा

by nagesh
Pune Crime | 80 lakh fraud on the pretext of getting KFC franchise

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | केएफसी रेस्टॉरंटची फ्रेंचायजी (KFC Restaurant Franchise) मिळवून देण्याचा बहाणा करुन
एका महिलेला सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तब्बल 79 लाख 76 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी गोखलेनगरमधील एका 46 वर्षाच्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 मार्च ते 24 मे 2022 दरम्यान (Pune Crime) घडला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएफसी रेस्टॉरंट प्रा. लि. याचे नावाने केएफसी फ्रेंचायजी मिळवून देण्याचा बहाणा केला.
फिर्यादी यांनी संपर्क साधल्यावर एनओसी काढून देण्यासाठी,
फ्रेंचायजीचा कालावधी ठरविण्यासाठी सेक्युरिटी डिपॉझिट, इंटेरिअर/फर्निचरसाठी अशा विविध कारणांसाठी केएफसी रेस्टॉरंटचे प्रतिनिधी म्हणून गौरव निगम (Gaurav Nigam), राहुल शिंदे (Rahul Shinde), राहुल मॅथ्यू (Rahul Mathew)
अशा वेगवेगळ्या नावाने संपर्क साधून त्यांना केएफसी फ्रेंचायजी देण्याचा बहाणा केला.

फिर्यादी यांना खोटे इन्व्हॉईस/दस्तऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासविले.
त्यासाठी त्यांनी केएफसी फ्रेंचायजी सारखे हुबेहुब लोगो, चिन्ह वापरुन त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात 79 लाख 76 हजार 500 रुपये भरायला लावून फसवणूक (Fraud) केली.
सहायक पोलीस निरीक्षक भालेराव (API Bhalerao) तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | 80 lakh fraud on the pretext of getting KFC franchise

हे देखील वाचा :

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात गुंडाचा तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न

Pune PMC Hospital Warje Malwadi | वारजे येथे 700 बेडस्‌चे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल उभारण्यास शासनाचा हिरवा कंदील

Central Home Minister Medal | पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन तपासी अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

Related Posts