IMPIMP

Pune Crime | पुण्यातील बिल्डरवर कुर्‍हाडीने हल्ला

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | उत्तमनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकावर (Builders In Pune) वर्गणी देण्यावरुन झालेल्या वादातून कुर्‍हाडीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) करण्यात आला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. (Pune Crime)

जीवन सुरेश पवार Jeevan Suresh Pawar (वय २०, रा. भिकोबा मोरे चाळ, सदगुरु कृपा हाईटस, उत्तमनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी चंद्रकांत रामचंद्र मोरे Chandrakant Ramchandra More (वय ४४, रा. किर्तीनगर, वडगाव) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttam Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११६/२२) दिली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे यांचे मोरे एम्पायर बिल्डींगमधील मोरया रेसिडेन्सी येथे कार्यालय आहे. त्या ठिकाणी ३० ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाची वर्गणीसाठी जीवन व त्याचा साथीदार गेला होता. त्यावेळी वर्गणीवरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी १० वाजता मोरे आपल्या कार्यालयात असताना जीवन त्याच्या साथीदारासह आला. त्यांनी मोरे यांच्या डोक्यात कुर्‍हाड तसेच दगडाने वार करुन जबर जखमी केले. या घटनेत मोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे,
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे व इतरांनी घटनास्थळी भेट दिली.
जीवन पवार याला पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | An ax attack on a builder in Pune

हे देखील वाचा :

Battery Cell Production मध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याची तयारी, 2030 पर्यंत होईल 9 बिलियन डॉलरची गुंतवणूक

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

Related Posts