IMPIMP

Pune Crime | तोतया पोलिसाची स्पा सेंटर चालकाला धमकी; म्हणाला – ‘1 लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन’,

by nagesh
Pune Pimpri Crime | Police Raid On A One Spa Sangvi Police Station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पोलीस (Police) असल्याचे सांगून एकाने स्पा मसाज सेंटर (Spa Massage Center) चालकाकडे 1 लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी (Threat) आरोपीने दिली. तसेच यातील काही रक्कम आरोपीने स्विकारली. हा धक्कादायक प्रकार (Pune Crime) सोमवारी (दि.7) दुपारी 3.50 च्या सुमारास पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मधील पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विशाल कैलास जौंजाळे Vishal Kailas Jaunjale (वय – 28 रा. हिंजवडी रोड – Hinjewadi Road, शिंदे वस्ती, मारुंजी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश शांताराम शिंदे Avinash Shantaram Shinde (वय – 26 रा. दौलत प्लाझा, कोपर आळी, लोहगाव – Lohgaon, ता. हवेली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव (API Sambhaji Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी विशाल जौंजाळे हा रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) एजंट म्हणून (Agent) काम करतो.
तर शिंदे यांचा पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात स्पा मसाज सेंटर आहे. आरोपी विशालने त्यांना पोलीस असल्याचे सांगितले.
त्यानंतर स्पा मसाज सेंटरमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कार्यवाही न करण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
तसेच पैसे न दिल्यास स्वत:कडे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपीने शिंदे यांना स्पा मसाज सेंटरची आणि त्यामध्ये काम करणाऱ्या मुलींची बदनामी करण्याची धमकी देऊन स्पा सेंटरमध्ये 5 हजार रोख आणि 1 हजार ऑनलाइन स्विकारले.
त्यानंतर आरोपीने शिंदे यांच्याकडे 70 हजार रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि पोलिसांना सांगून कार्यवाही करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | bogus police threaten spa center operators if you dont pay rs 1 lakh the video will go viral

हे देखील वाचा :

Girish Mahajan | गिरीश महाजनांच्या सभागृहात डुलक्या, शेलारांनी कोपरखळी मारताच देऊ लागले घोषणा, भन्नाट व्हिडिओ व्हायरल (व्हिडिओ)

Gopichand Padalkar | ‘अजित पवार यांच्या शब्दाला काडीची किंमत राहिली नाही’ – गोपीचंद पडळकर

Reduce Belly Fat | सकाळी रिकाम्यापोटी ‘हे’ 5 ड्रिंक प्यायल्याने वितळू शकते पोटाची चरबी, लवकर दिसू लागेल प्रभाव

Related Posts