IMPIMP

Pune Crime | ज्येष्ठाला लुटणाऱ्या कॅबचालकाला पोलिसांनी केली अटक; साथीदारांचा शोध सुरू

by nagesh
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   सिंहगड पोलीस पथकाने एका कॅबचालकाला अटक केली आहे. त्याच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला या चालकाने लुटले (Pune Crime) होते. सदर कॅब चालक आणि त्याच्या साथीदाराने संबंधित नागरिकांकडून जबरदस्तीने त्याच्या एटीएम कार्डाचा पिन नंबर घेऊन पैसे काढले. त्या पैशांतून महागडा फोन, सोन्याची चैन, खरेदी केली होती. पोलिसांनी आरोपीला (Pune Crime) अटक केली असून, त्याच्याकडून जवळजवळ साडेसात लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कृष्णा उत्तम कांबळे असे या कॅबचालकाचे नाव असून, त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. ही घटना २ ऑक्टोबरला घडली होती. याबाबत ७७ वर्षीय वृद्धाने तक्रार नोंदवली होती. तक्रारदार मुंबईचा रहिवाशी असून, कामानिमित्त पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर त्यांनी कॅब घेतली, पण आरोपीने कॅबमधून फिरवले आणि त्याच्या कॅबमध्ये त्याचा साथीदार श्रीधर साहू आणि अजून एक जण बसला. त्यानंतर या तिघांनी जबरदस्तीने फिर्यादीचे एटीएम घेऊन त्याचा पिन मिळवला. त्यानंतर त्यांनी त्या कार्डाने एक आयफोन, एक लाखाची सोन्याची चैन आणि एक दुचाकी विकत घेतली. तोपर्यंत सदर नागरिकाने सिंहगड पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली.

जेव्हा आरोपी नवले पुलाखाली आहे अशी माहिती मिळाली, तेव्हा माहिती तपास पथकाचे सहायक निरीक्षक सचिन निकम,
पोलीस शिपाई अविनाश कोंडे यांनी सापळा रचून सोनावणेला अटक केली. त्याची चौकशी केली असता,
त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून एक आयफोन, सोन्याची चैन,
दुचाकी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी असा एकूण ७ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याच्या बाकीच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा,
सहायक आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर,
सहायक निरीक्षक सचिन निकम, हवालदार संजय शिंदे, अमित बोडरे, देवा चव्हाण, सागर शेंडगे, स्वप्नील मगर,
शिवाजी क्षीरसागर करत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | cab driver who forcibly robbed senior passenger arrested 7 lakhs including gold chain mobile phone seized pune crime news

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | बावधनातील गोल्डन क्राऊन लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

IPL 2023 | ड्वेन ब्राव्होची आयपीएलमधून निवृत्ती; सीएसकेने त्याच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Rituraj Gaikwad | ‘आगामी वनडे विश्वचषकात ऋतुराज गायकवाड नक्की दिसेल’; प्रशिक्षक मोहन जाधव यांनी व्यक्त केला विश्वास

Related Posts