IMPIMP

Pune Crime Court News | मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Molestation Case

मावळ : Pune Crime Court News | मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकास वडगाव-मावळ न्यायालयातील (Vadgaon Maval Court) सत्र न्यायाधीश जे. एल गांधी (Judge J L Gandhi) यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Molestation Case)

दिलीप बबनराव घोडेकर Dilip Babanrao Ghodekar ( वय ५०, रा. मावळ ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घोडेकर विरुद्ध शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी दुकानातून दूध घेऊन येत होती. त्यावेळी घोडेकरने तिला अडवले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील स्मिता चौगुले (Smita Chougule) यांनी बाजू मांडली.

साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालायने घोडेकरला तीन वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रक्कमेपैकी १५ हजार रुपये पीडित मुलीस द्यावे, असे न्यायालयाने आदेशात म्हंटले आहे.

देहूरोड विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे (ACP Devidas Gheware), तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे (Talegaon Dabhade Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी (Sr PI Digambar Suryavanshi) यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस गाडीलकर यांनी तपास केला.