IMPIMP

Pune Crime | सराईत शिकलगरी टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत शिकलगरी टोळीतील (Shikalgari gang) दोन गुन्हेगारांना (Pune Crime) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Crime Branch Unit 3) पथकाने अटक केली आहे. अटक (Arrest) करणाऱ्यात आलेल्या आरोपींकडून 3 लाख 29 हजार 265 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) शिवणे येथील शिंदे पुल येथे करण्यात आली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे पोलीस आयुक्तांनी घरफोडी गुन्ह्यांचे उकल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये (Uttamnagar Police Station) दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार दीपक क्षीरसागर (Deepak Kshirsagar) यांना सराईत गुन्हेगारांची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट तीनच्या पथकाने शिवणे येथील शिंदे पुलावर सापळा रचून शिकलगरी टोळीतील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी 4 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील (Pune Crime) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
गुन्हे शाखा सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan)
यांच्या नेतृत्वाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक धवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale)
यांच्यासह पोलीस अंमलदार महेश निबांळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, राकेश टेकवडे,
सजिव कळंबे, ज्ञानेश्वर चिते, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Crime Branch arrests two members of Sarait Shikalgari gang, seizes Rs 3 lakh

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील पिसोळी-उंड्री रस्त्यावर भरधाव वेगात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु

30 जूनपूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांची Gratuity वाढून येणार, 1 लाखावरून 7 लाख रुपयांचा होईल फायदा

Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’

Related Posts