IMPIMP

Pune Crime | कोंढव्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आजपर्यंत 62 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune criminal lodged in Aurangabad Jail for one year CP Amitabh Gupta takes action against 63 people under MPDA Act

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 62 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार अरबाज उर्फ फुग्गा समीर शेख (वय-24 रा. कुबा मस्जिद, मिठानगर, नवाजीश पार्क, कोंढवा खुर्द) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. अरबाज उर्फ फुग्गा शेख याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर कारागृहात (Nagpur Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

अरबाज उर्फ फुग्गा शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, सत्तूर, सुरा, लाकडी दांडके यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, घरा विषयक आगळीक, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 06 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अरबाज उर्फ फुग्गा शेख याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil), पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत 62 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

Web Title :- Pune Crime | criminal from Kondhwa lodged in Nagpur Jail for one year! CP Amitabh Gupta’s action against 62 people till date under MPDA Act

हे देखील वाचा :

Nitesh Rane | ‘नंदकिशोर चतुर्वेदीचा मनसुख हिरेन तर झाला नाही ना’ – नितेश राणे

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; 4500 रुपयांचा थेट लाभ, जाणून घ्या

Girish Bapat | पुरंदर, बारामती विमानतळाला विरोध नाही, पण पुण्यातील लोहगाव विमानतळ कुठेही हलवणार नाही – गिरीश बापट

Related Posts