IMPIMP

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | हौसेसाठी व परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी देशी पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण सराईत गुन्हेगार (Pune Criminals) असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) विनयभंगाचे (Molestation Case) गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त (Pune Crime) केली आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मनिष प्रकाश घडशी Manish Prakash Ghadashi (वय-22 रा. अंबिल ओढा कॉलनी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आोरपीचे नाव आहे. त्याच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी (दि.5) सिंहगड रोडवरील भंडारी हॉटेल समोर करण्यात आली. (Pune Crime)

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे (Police Kundan Shinde), दत्ता मरगळे (Police Datta Margale), अमीर पटेल (Amir Patel) व अमित सुर्वे (Amit Surve) यांना माहिती मिळाली की, एक तरुण देशी बनावटीचे पिस्टल सोबत घेऊन सिंहगड रोड (Sinhagad Road) भंडारी हॉटले समोर थांबला आहे व त्याच्या हातावर गोंदलेले आहे. पोलिसांनी भंडारी हॉटेल समोर सपाळा रचून आरोपी मनिष घडशी याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे पिस्टल आणि दोन काडतुसे (Cartridges) आढळून आले. पोलिसांनी 35 हजार 500 रुपयांचे पिस्टल जप्त केले आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad),
सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomane)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार (PSI Swapnil Lohar),
चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस हवालदार कुंदन शिंदे, दत्ता मरगळे,
अमीर पाटेल, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे, किशोर वळे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे,
नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अनिस तांबोळी, हेमंत धायगुडे यांच्या पथकाने केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

हे देखील वाचा :

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

Pune Crime | थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

Vegetables For Cholesterol | कोलेस्ट्रॉल शोषून घेऊन रक्त वाहिन्यांना स्वच्छ आणि मजबूत बनवू शकतात ‘या’ 5 भाज्या

Related Posts