IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या खराडी परिसरातील गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये 91 लाखांची वीजचोरी, एकावर FIR

by nagesh
Electricity Theft In Pune Wagholi | Major electricity theft caught in Wagholi; Electricity theft of 1 crore 44 lakh was revealed in two incidents

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनघरगुती (domestic) व वाणिज्यिक इमारतींच्या (commercial building) बांधकामांसाठी दिलेल्या वीजजोडण्यांची महावितरणकडून (MSEDCL) नियमित तपासणी सुरु आहे. या तपासणीमध्ये पुण्यातील (Pune Crime) खराडी (Kharadi) येथे बांधकाम (Construction) सुरु असलेल्या गॅलेक्झी अपार्टमेंटमधील (Galaxy apartment) दोन इमारतींसाठी अनधिकृत केबलद्वारे थेट वीजपुरवठा (Power supply) घेऊन सुरु असलेली तब्बल 91 लाख 35 हजार 345 रुपयांची वीजचोरी शुक्रवारी (दि. 17) महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली.
याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

महावितरण कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नगररोड विभाग अंतर्गत वडगाव शेरी उपविभागाचे (Wadgaon Sheri subdivision) अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने (Dilip Madane) यांच्यासह सहायक अभियंता सचिन पुंड (Sachin Pund) व अस्मिता कोष्टी (Asmita Koshti) तसेच जनमित्र गणेश सुरसे व विठ्ठल कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी खराडी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या काही इमारतींच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यामध्ये इऑन आयटी पार्कजवळील (Ion IT Park) गॅलेक्झी वन व टू या अपार्टमेंटच्या बांधकामासाठी दिलेल्या वीजजोडणीची तपासणी करण्यात आली. (Pune Crime)

खराडी येथील रोशन रमेश दुसाने (Roshan Ramesh Dusane) या ग्राहकाच्या नावे महावितरणकडून तीन फेज व 14 किलोवॅट क्षमतेची ही वीजजोडणी देण्यात आली आहे. पथकाच्या तपासणीमध्ये मात्र या वीजजोडणीच्या सहाय्याने आणखी 40 मीटर लांबीची एक अनधिकृत केबल टाकून गॅलेक्झी वन व टू या इमारतींसाठी विजेची मोठी चोरी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या अपार्टमेंटच्या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून दोन्ही इमारतींमधील सुमारे 30 फ्लॅटमधील रहिवासी, कॉमन वापरासाठी पाण्याच्या मोटर्स, दोन लिफ्टस्, पार्किंग लाईट इत्यादींसाठी वीजचोरी सुरु असल्याचे व त्यासाठी कोणतीही अधिकृत व स्वतंत्र वीजजोडणी घेतलेली नाही असे तपासणीमध्ये आढळून आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

महावितरणने वीजचोरीच्या प्रकाराचा पंचनामा करून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली केबल व इतर साहित्य जप्त केले.
पंचनाम्यानंतर अनेक फ्लॅटस्, लिफ्ट, पाण्याची मोटर व इतर कारणांसाठी एकूण 2,11,433 युनिटची म्हणजे 91 लाख 35 हजार 345 रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. गॅलेक्झी अपार्टमेंटमधील वीजचोरीच्या प्रकाराची पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता (Chief Engineer of Pune Circle)
सचिन तालेवार (Sachin Talewar), रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत तसेच
कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.
या वीजचोरी प्रकरणी महावितरणकडून तक्रार दाखल केल्याप्रमाणे
चंदननगर पोलीस ठाण्यात वीजजोडणीधारक रोशन रमेश दुसाने
या ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 मधील कलम 135, 138 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Pune Crime | Electricity Theft Worth Rs 91 Lakh Detected At Galaxy One And Two Kharadi, FIR Registered

हे देखील वाचा :

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..

Earn Money | नोकरी सोडून 50 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना होईल 1 लाख रुपयांची कमाई, सरकार देईल 35% सबसिडी

Pune Crime | अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ! पिंपरी परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी 5 जणांना अटक

Related Posts