IMPIMP

Pune Crime | सिंहगड रोड, मुंढव्यातून तडीपारांना अटक

by nagesh
Pune Crime News | Bundagarden Police arrests inn vehicle thief, seizes autorickshaw, motorcycle

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   शहरातून तडीपार केले असतानादेखील पिस्तूल (Pune Crime) घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. सिंहगड भागात पोलिसांनी कारवाई करत सराईत गुन्हेगाराकडून एक देशी पिस्तूल आणि काडतुसे हस्तगत केली आहेत, तर दुसरीकडे मुंढवा भागातदेखील अशाच एका तडीपार गुंडाच्या (Pune Crime) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अजय शंकर सुतार (वय 20, रा. नऱ्हे) असे सिंहगड भागात अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. सुतार याला शहरातून तडीपार केल्याले आहे. तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो त्या भागात फिरत होता. पोलिसांना तो सिंहगड भागात असल्याची माहिती मिळाली. सिंहगड परिसरातील वडगाव उड्डाणपुलाजवळ तो थांबला होता.

त्याच्याकडे पिस्तूल आणि काडतुसे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहीद शेख, बाळू गायकवाड, गणेश ढगे, रवींद्र लोखंडे यांचा कारवाईत सहभाग होता.

दुसऱ्या एका कारवाईत मुंढवा भागातून सागर शंकर घोडके (वय 22, रा. मुंढवा) याला अटक करण्यात आली.
तो मगरपट्टा सिटी भागात थांबला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे,
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक निरीक्षक संदीप जोरे, दिनेश राणे,
संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांनी ही कारवाई केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | even after tadipari gangsters roam the city with weapons tadipar arrested from sinhagad road mundhwa

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी मुख्यमंत्री कामाख्या देवीला नवस करणार की नाहीत? – उद्धव ठाकरे

Gadchiroli ACB Trap | पोलीस ठाण्यातच लाच घेताना पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | एजन्सीचे लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक; विश्रांतवाडीमधील घटना

Pune Crime | बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्या सराईतास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Related Posts