IMPIMP

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

by Team Deccan Express
Pune Crime | Fake Instagram account spreads obscene text about 36 year old teacher crime against college students

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शिक्षिकेच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट (Fake Instagram Account) तयार करुन त्यावर अश्लिल मजकूर (Pornographic Text) प्रसारित करुन आपल्याच शिक्षिकेची बदनामी (Defamation Of The Lady Teacher) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांकडे (Lonikand Police) एका ३६ वर्षाच्या महिलेने फिर्याद (गु रजि नं. २३७/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चाकण (Chakan) आणि मुंबईत (Mumbai) राहणार्‍या दोघा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शिक्षिका आहेत. त्यांच्या कॉलेजमधील चाकण येथे राहणार्‍या विद्यार्थ्यांने मुंबईतील विद्यार्थ्याच्या मदतीने फिर्यादीचा फोटो मोबाईल नंबर वापरुन त्यांचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट तयार केले. त्यावर अश्लिल मजकूर प्रसारित केला. फिर्यादी आणि संस्थेची बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Fake Instagram account spreads obscene text about 36 year old teacher crime against college students

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts