IMPIMP

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

अधिकार्‍यांनी पावणे तीन लाख रुपये घेऊन दिली बनावट प्रमाणपत्रे, अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

by nagesh
Pune Crime | Lure of investment in share market cheated 37 investors to the tune of 4 crores; A case has been registered at Sinhagad Road Police Station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांची (Pune ZP Education Officer) बनावट स्वाक्षरीची स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने (Jog Education Trust) शिक्षण विभागाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संस्थेच्या ११ शाळांचे मुख्याध्यापकांद्वारे २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे शुल्क मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे (Fake Document) तयार करुन ती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना सादर केली होती (Cheating Case). ही प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी पावणेतीन लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किसन दत्तोबा भुजबळ (वय ५३) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. १२२/२२) दिली आहे (Fraud Case). त्यानुसार जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग (Surekha Suhas Jog), वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेडगे, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी किशन पवार आणि मनरेगा विभागाचे वरिष्ठ सहायक हेमंत सावळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०१९ ते २४ मे २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी शिक्षण विभागाकडे तक्रार आली होती. त्याची चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी किशोर पवार, हेमंत सावळकर यांनी एज्युकेशन ट्रस्ट कडून एका स्व मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार रुपये याप्रमाणे अकरा सर्व मान्यता प्रमाणपत्रासाठी एकूण २ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे पोलिसांनी (Pune Police) केलेल्या तपासणीत दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये घुसून सावळकर यांनी कोणाचीही परवानगी न घेता जावक रजिस्टर मधील नोंदणी चे फोटो काढून शाळेचे कर्मचारी महेश कुलकर्णी यांना पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच प्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे आरटीई शुल्क प्रतिपूर्ती ची रक्कम मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलीस निरीक्षक सुनिल खेडेकर (Police Inspector Sunil Khedekar) अधिक तपास करीत आहेत. सुरेखा जोग या प्रसिद्ध अभिनेत्याच्या आई आहेत.

Web Title : Pune Crime | Famous actor’s mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Morning Health Tips | आपल्या दिवसाची सुरूवात करताना करा ‘या’ पोषक ड्रिंक्सपासून, मिळतील आरोग्यदायी फायदे

SBI Savings Account | SBI मध्ये असेल अकाऊंट तर लवकर उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा भरावा लागू शकतो दंड; जाणून घ्या

Blood Circulation Problem Symptoms | चेहर्‍यावरील ‘या’ गोष्टी दर्शवितात रक्ताभिसरण बिघडल्याचे संकेत; तात्काळ लक्ष द्या अन्यथा वाढू शकते समस्या, जाणून घ्या

Related Posts