IMPIMP

Pune Crime | वानवडी येथील पनीर कारखान्यावर FDA चा छापा,800 किलो बनावट पनीर जप्त

by nagesh
Pune Crime | FDA raids Paneer factory in Wanwadi Pune, 800 kg fake paneer seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर (Fake Cheese) तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस (Tip Top Dairy Products Wanwadi) या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा (Raid) मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन साठा जप्त (Pune Crime) करण्यात आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कारखान्यावर छापा टाकला असता 800 किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर (Skimmed Milk Powder) व 270 किलो पामोलिन तेल (Palmolein Oil) साठविल्याचे आढळले. साठ्यातुन तपासणीसाठी नमुने घेत किंमत 1 लाख 67 हजार 790 रूपये किमतीचे 799 किलो पनीर, 1 लाख 21 हजार 800 रूपये किमतीचे 348 किलो स्किम्ड मिल्क पावडर, 39 हजार 664 रूपये किमतीचे 268 किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण 3 लाख 29 हजार 254 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. (Pune Crime)

पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहायक आयुक्त बाळू ठाकूर (Assistant Commissioner Balu Thakur), अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे (Food Safety Officer Nilesh Khose) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे.
अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी,
आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे (Pune Division)
सह आयुक्त संजय नारागुडे (Joint Commissioner Sanjay Naragude) यांनी केले आहे.

Web Title :- Pune Crime | FDA raids Paneer factory in Wanwadi Pune, 800 kg fake paneer seized

हे देखील वाचा :

Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Pune Metro Station | मेट्रो स्टेशनच्या कामामुळे डेक्कन जिमखाना बस स्टॉप येथून भिडे पूलावर येणार्‍या वाहनांसाठी उद्यापासून रस्ता बंद

Gyanvapi Mosque Case | ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

Related Posts