IMPIMP

Pune Crime | पुण्यात विषारी औषध पाजून शेळीला मारले; हडपसरमध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | चपातीमध्ये विषारी औषध मिसळून ती शेळीला खायला देऊन तिचा मृत्यु (Death of a goat in pune) घडवून आणला असल्याची फिर्याद एका महिलेने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) दिली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या फिर्यादीवरुन हडपसर (Hadapsar News) पोलिसांनी गोंधळेनगर (Gondhale Nagar) येथे राहणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुनाबाई पंडीत जोगदंड (वय ६६, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या घराजवळ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. जोगदंड यांनी एक शेळी पाळली होती. तिला आरोपी महिलेने चपातीमध्ये विषारी औषध मिसळून शेळीला खायला दिली. त्यामुळे शेळीचा मृत्यु (Pune Crime) झाला असल्याचा तिचा दावा आहे. हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता या शेळीचे शवविच्छेदन करुन तिचा मृत्यु नेमका कशामुळे घडला, याचा तपास पोलीस करणार आहेत. पोलीस हवालदार लोखंडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Goat killed by poisonous drug in Pune; Filed a case against a woman in Hadapsar police station

हे देखील वाचा :

Vaishno Devi Stampede | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी ! 12 भाविकांचा मृत्यु, 20 हून अधिक भाविक जखमी

Coronavirus in Maharashtra | धक्कादायक ! महाराष्ट्रातील 10 मंत्र्यांना आणि 20 आमदारांना कोरोनाची बाधा, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं

LPG Cylinder Price | नवीन वर्षात मोठी भेट ! थेट 100 रुपये स्वस्त झाला कमर्शियल LPG सिलेंडर, घरगुती सिलेंडरमध्ये बदल झाला का?, जाणून घ्या

Sun And Saturn Together In Capricorn Zodiac Sign | जानेवारी 2022 मध्ये मकर राशीत असतील दोन ‘शत्रु’ ग्रह, ‘सूर्य’ आणि ‘शनी’ची ही युती 5 राशींसाठी अतिशय शुभ

Multibagger Stock | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने 12 वर्षात 1 लाख रुपयांचे केले 3.37 कोटी; एक नजर टाकूयात 1.63 रुपयांपासून 550 रुपयांपर्यंतच्या या प्रवासावर

Related Posts