IMPIMP

Pune Crime | जुन्नर तालुक्यातील अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास पूर्ण, IG मनोज लोहिया यांची माहिती

by nagesh
Pune Crime | junnar anant gramin sahkari pathsanstha robbery primary inquiry complete IG manoj lohia pune rural police

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | जुन्नर तालुक्यातील 14 नंबर कांदळी येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर (Anant Gramin Pathsanstha Robbery Case) भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. बुधवारी (दि.24) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात (shooting) पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा (manager) मृत्यू (Pune Crime) झाला आहे. आज (गुरुवार) सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police Manoj Lohia), पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी घटनास्थळाला भेट दिली. यानंतर घटनेच्या तपासासंदर्भात मनोज लोहिया यांनी माहिती दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अनंत ग्रामिण सहकारी पतसंस्थेतील दरोड्याचा प्राथमिक तपास झाला असून हा गुन्हा सराईत गुन्हेगारांनी (criminal) केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हेगार कोणत्या दिशेने आले व घटनेनंतर कोणत्या दिशेने गेले ही माहिती मिळाली आहे. या ठिकाणी व इतर ठिकाणी झालेल्या दरोड्याच्या अशा घटनेत साम्य दिसून येत आहे. तपास योग्य दिशेने (Pune Crime) सुरु आहे, अशी माहिती मनोज लोहिया यांनी दिली.

बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोन सशस्त्र दरोडेखोरांनी अनंत ग्रामिण पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर (Rajendra Bhor) यांच्यावर गोळीबार करुन अडीच लाख रुपये लुटले. या घटनेत भोर यांचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसात उमटले आहे. दरोडा टाकल्यानंतर आरोपी जांबुत फाटा मार्गे बोरी बुद्रुकच्या दिशेने गेले. आरोपींनी वापरलेले दोन हेल्मेट, कपडे बोरी बुद्रुक येथे रात्री पोलिसांना मिळाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आज सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली.
यावेळी आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke), सभापती संजय काळे, अनंत ग्रामिण पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम भोर उपस्थित होते.
यावेळी मनोज लोहिया यांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ही घटना तालुक्यातील शांतता भंग करणारी असल्याचे बेनके यांनी म्हटले.
तसेच पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरु केला आहे.
अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल असे बेनके म्हणाले.

Web Title :- Pune Crime | junnar anant gramin sahkari pathsanstha robbery primary inquiry complete IG manoj lohia pune rural police

हे देखील वाचा :

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार

Sonam Kapoor | सोनमच्या ब्रालेटमधील ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे नेटकरी संतप्त

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची स्कीम तुम्हाला देईल 16 लाख रुपयांचा फायदा, तुम्हाला केवळ 10,000 रुपयांची करावी लागेल बचत

Related Posts