IMPIMP

Pune Crime | मार्केट यार्ड गोळीबार प्रकरण ! कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक; आरोपींमध्ये मंगळवार पेठ, रामनगर-वारजे, शिवणे, शिवाजीनगर परिसरातील तरूणांचा समावेश

by nagesh
Pune Crime | Market yard shooting case ! Gang who robbed courier company office arrested by crime branch; The accused included youths from Mangalwar Peth, Ramnagar-Warje, Shivani, Shivajinagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | पुण्यातील मार्केट यार्ड येथील एका कुरिअर कंपनीच्या (Courier Company) कार्यालयात शिरुन चोरट्यांनी गोळीबार (Market Yard Firing Case) करत तब्बल 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी (दि.12) दुपारी घडली होती. रोकड लुटून पसार झालेल्या आरोपींच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell Pune) मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्यांकडून 11 लाख 18 हजार रुपयांची रोकड, सात मोबाईल, तीन दुचाकी, कोयता असा एकूण 13 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अविनाश उर्फ सनी रामप्रताप गुप्ता (वय-20, रा. मंगळवार पेठ), आदित्य अशोक मारणे (वय -28, रा. रामनगर, वारजे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय -19, रा. राहुलनगर, शिवणे), विशाल सतीश कसबे (वय-20, रा. मंगळवार पेठ), अजय बापू दिवटे (वय -23, रा. रामनगर, वारजे), गुरूजनसिंह सेवासिंह वीरक (वय -20, रा. शिवाजीनगर), निलेश बाळू गोठे (वय -20, रा. मंगळवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

मार्केट यार्ड येथील भुसार बाजार परिसरातील एका इमारतीत पी.एम. कुरिअर कंपनीचे कार्यालय
(P.M. Courier Company) आहे. शनिवारी दुपारी आरोपींनी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवला. कर्मचाऱ्यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी जमिनीवर गोळीबार करुन कार्यालयातील 27 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटून पळून गेले.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध खंडणी विरोधी पथक घेत होते. त्यावेळी कुरिअर कंपनीत दरोडा गुप्ता आणि
त्याच्या साथिदारांनी मिळून घातल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत देली.

आरोपी गुप्ता याच्या विरोधात वारजे पोलिसांनी (Warje Police) मोक्का अंतर्गत कारवाई केली असून तेव्हापासून तो फरार झाला होता. तर आरोपी मारणे याच्या विरोधात देखील मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. मोक्का कारवाईनंतर मारणे हा येरवडा कारागृहात (Yerwada Jail) होता. न्यायालयाकडून जामीन मिळवून तो कारागृहातून बाहेर आला होता. गुप्ता आणि मारणे हे सराईत गुन्हेगार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कारागृहात रचला कट

आरोपी गुप्ता, मारणे आणि साथीदारांची ओळख कारागृहात झाली होती. कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात रोकड असते. त्यामुळे आरोपींनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याचा कट कारागृहात रचला होता, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
पोलीस उप निरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), पोलीस अंमलदार यशवंत ओंबासे, मयूर तुपसौंदर,
सयाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.

Web Title :- Pune Crime | Market yard shooting case ! Gang who robbed courier company office arrested by crime branch; The accused included youths from Mangalwar Peth, Ramnagar-Warje, Shivani, Shivajinagar area

हे देखील वाचा :

Patthe Bapurao Award | पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर ! तांबे, बारामतीकर व कुडाळकर पुरस्काराचे मानकरी; अमन तांबे यांना पठ्ठे बापुराव पुरस्कार, लावणी महोत्सवाचे आयोजन

Radhakrishna Vikhe Patil | राज ठाकरेंच्या भविष्यवाणीवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Dinesh Lal Yadav and Monalisa | ” प्यार वाली बात होखेड़ा “, पहा दिनेश लाल यादव आणि मोनालिसाचा रोमँटिक डान्स (VIDEO)

Related Posts