IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार श्रीनाथ उर्फ टिक्या शेलार व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’; आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 87 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 87 टोळ्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune Crime) खडक पोलीस ठाण्याच्या (Khadak Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार (Pune Criminals) श्रीनाथ उर्फ टिक्या अशोक शेलार Srinath alias Tikya Ashok Shelar (वय-22) व त्याच्या टोळीतील 2 जणांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 87 आणि चालु वर्षात 24 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख श्रीनाथ उर्फ टिक्या अशोक शेलार (वय-22 रा. झगडे आळी, घोरपडे पेठ, पुणे) टोळी सदस्य कुणाल सुरेश जाधव Kunal Suresh Jadhav (वय-22 रा. कैकाडी आळी, घोरपडे पेठ, पुणे), गणेश बल्लप्पा कोळी Ganesh Ballappa Koli (वय-21 रा. घोरपडे पेठ, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी परिसरात दहशत निर्माण केली आहे. (Pune Crime)

टिक्या शेलार व त्याच्या साथीदारांनी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. जबरी चोरी, दरोड्याची (Robbery) पुर्व तयारी करणे, खंडणी (Extortion), खुनाचा कट रचणे (Commit Murder), मारामारी, गंभीर दुखापत, अपहरण (Kidnapping), लहान मुलींची छेड काढणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Police Inspector Srihari Bahirat) यांनी परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Naranware) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (Faraskhana Division ACP Satish Govekar) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परीमंडळ 1 प्रियंका नारनवरे,
फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट,
पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे (Police Inspector Rajesh Tatkare)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक राहूल खंडाळे (PSI Rahul Khandale), पोलीस अंमलदार सतिश नागुल, नितीन जाधव, महेश पवार, दिनेश खरात यांनी केली.

आयुक्तांची 87 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
आतापर्यंत 87 तर चालु वर्षात 24 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | MCOCA Mokka Action On Pune criminal Srinath alias Tikya Shelar and his gang Commissioner Amitabh Guptas 87th action till date

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts