IMPIMP

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | आपली दहशत निर्माण करण्यासाठी व बदला घेण्यासाठी गोळीबार (Firing) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) करणार्‍या निलेश गायकवाड (Nilesh Gaikwad Gang) याच्यासह त्याच्या टोळीतील 11 जणांवर मोक्का Mokka (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेली ही 61 वी ‘मोक्का’ कारवाई (Pune Crime) आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

निलेश विजय गायकवाड (रा. रामनगर, वारजे), अक्षय रवींद्र खवळे, ऋतिक कैलास एखंडे (रा. म्हात्रे पुलाजवळ), विकी ऊर्फ हेमंत धर्मा काळे (रा.
रामनगर, वारजे), मोन्या ऊर्फ रामेश्वर सुभाष मोरे, कार्तिक संजय इंगवले (वय १८), अनिरुद्ध ऊर्फ बाळा राजू जाधव (वय २४, रा. रावेत गाव), अरविंद
मारुती माडकर (वय ३०, रा. रामनगर, वारजे), अक्षय ऊर्फ अवधुत महेश यादव (वय २७), संकेत राजेंद्र ढेणे (वय २३, रा. वारजे), विकास कैलास
गव्हाड (वय २०, रा. सहयोगनगर, वारजे) अशी ‘मोक्का’ कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत.

निलेश गायकवाड टोळीने (Nilesh Gaikwad Gang) वारजे, उत्तमनगर (Uttamnagar) परिसरातील आपल्या टोळीची दहशत निर्माण केली आहे.
त्यांनी खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder), शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करुन दहशत निर्माण केली होती.

केदार भालशंकर हा मोटारीने जात असताना ८ ऑगस्ट रोजी शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड (NDA Road, Pune) दरम्यान पाठलाग करुन निलेश
गायकवाड व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन त्याला जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे (Uttamnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (Senior Police Inspector Sunil
Jaitapurkar) यांनी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP
Rajendra Dahale) यांच्याकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण (Maharashtra Control of Organised Crime Act) MCOCA अंतर्गत
कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन मोक्का कारवाईला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त अमिताभ
गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही आतापर्यंतची 61 वी कारवाई आहे.

Web Title : Pune Crime | MCOCA on 11 persons including Nilesh Gaikwad from Warje Malwadi in pune ; 61st action of Police Commissioner Amitabh Gupta

हे देखील वाचा :

Madhurima Tuli | बिग बाॅस फेम मधुरिमा तुलीचा निळ्या मोनोकनीमध्ये जलवा, रिकामे केस आणि मेकअपमध्ये स्टनिंग लुक

Katrina Kaif | विकी कौशलला जल्लोषात हवं लग्न तर कतरीनाला हवं खाजगी लग्न

Karjat Nagar Panchayat Election | कर्जत नगर पंचायत निवडणुक ! कोण मारणार बाजी? राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये ‘सामना’

Related Posts