IMPIMP

Rakesh Jhunjhunwala Portfolio | ₹ 100 वर जाऊ शकतो ‘हा’ शेअर, राकेश झुनझुनवाला यांनी लावला मोठा डाव; आता अतिशय स्वस्त मिळतोय स्टॉक

by nagesh
rakesh-jhunjhunwala-portfolio-rakesh-jhunjhunwala-portfolio-stock-federal-bank-share-may-go-up-to-100-rupees-expert-bullish

नवी दिल्ली :वृत्तसंस्था Rakesh Jhunjhunwala Portfolio | शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला फेडरल बँकेचा (Federal Bank) शेअर 90 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात एनएसईवर रू. 107.55 च्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर गेल्यापासून तो सतत विक्रीच्या दबावाखाली आहे. गेल्या आठवड्यात, स्टॉक 7 टक्क्यांहून अधिक तोट्यात होता. (Rakesh Jhunjhunwala Portfolio)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शुक्रवारी राकेश झुनझुनवाला यांचा हा स्टॉक प्रति शेअर रू. 83.55 वर बंद झाला होता. ही किंमत त्याच आठवड्याचा उच्चांक रू. 107.55 च्या स्तरावरून 22 टक्क्यांपेक्षा जास्त कमी आहे. मात्र, शेअर बाजारातील तज्ञ साऊथ इंडियन बँकेच्या या शेअर (Banking stock) च्या या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहत आहेत. (Rakesh Jhunjhunwala Portfolio)

₹ 100 पर्यंत जाऊ शकतो शेअर

Federal Bank च्या शेअरवर चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, हा बँकिंग स्टॉक चार्ट पॅटर्नवर मजबूत दिसत आहे. सध्या तो रू. 83 ते रू. 90 च्या रेंजमध्ये व्यवहार करत आहे. जर त्याने 90 च्या वर ब्रेकआउट दिला तर तो खूप तेजीत दिसून येईल आणि शेअर अल्पावधीत रू. 98 ते रू. 100 पर्यंत जाऊ शकतो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राकेश झुनझुनवाला यांची फेडरल बँकेत हिस्सेदारी

Q4FY22 साठी फेडरल बँकेच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची साउथ इंडिया बँकेत हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि रेखा झुनझुनवाला यांच्याकडे फेडरल बँकेत संयुक्तपणे 2,10,00,000 शेअर्स किंवा 1.01 टक्के शेअर्स आहेत तर राकेश झुनझुनवाला यांच्याकडे वैयक्तिक क्षमता 5,47,21,060 किंवा 2.64 टक्के आहे. तर, झुनझुनवाला दाम्पत्याकडे फेडरल बँकेचे 7,57,21,060 शेअर्स किंवा 3.65 टक्के आहेत.

हे देखील वाचा :

Umakant Kanade | ‘कृष्ण धवल’ चित्रांचा राजा उमाकांत कानडे

Broccoli Juice Benefits | ब्रोकोलीच नव्हे तर त्याचा रसही आरोग्यासाठी खूप फायदेशीर; जाणून घ्या

Intestine Cure | शरीराकडून वेळोवेळी मिळणारे काही संकेत दर्शवितात आपल्या आतड्यांची स्थिती, जाणून घ्या

Related Posts