IMPIMP

LPG Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! घरगुती LPG सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या

by nagesh
Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LPG Cylinder Price Hike | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असल्याचं दिसत आहे. महागाईची झळ सोसत असलेल्या नागरीकांना आता पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी झटका दिला आहे. आज (गुरूवारी) घरगुती गॅस सिलेंडर (Domestic Gas Cylinder) म्हणजेच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Price Hike) वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3.50 रुपये प्रति सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 8 रुपये प्रति सिलिंडरची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पार गेला आहे.

वाढलेल्या किमतीनंतर आता दिल्ली (Delhi) घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर 1003 रुपये झाल आहे. तर कोलकात्यात (Kolkata) घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1029 रुपयांवर पोहचली आहे. त्याचबरोबर, चेन्नईत (Chennai) एका सिलिंडरसाठी आता 1018 रुपये द्यावे लागणार आहेत. (LPG Cylinder Price Hike)

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीनंतर दिल्लीतील एका व्यावसायिक सिलिंडरचा दर 2354 रुपये झाला आहे. तर कोलकाता, मुंबई, चेन्नई या ठिकाणी हा दर अनुक्रमे 2454 रुपये, 2306 रुपये आणि 2507 रुपये प्रति सिलिंडर इतका झाला आहे. याआगोदर 7 मार्च रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 10 रुपयांची घट झाली होती. तसेच, 8 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. 1 मे रोजी एलपीजी गॅसच्या दरात (19 Kg) 102 रुपये 50 पैसे रुपयांची वाढ करण्यात आली होती.

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Municipal Election 2022 | पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग जाहीर; जाणून घ्या नावे

Maharashtra Monsoon Updates | आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार – IMD

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

Shirdi Airport | शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लॅडींग सुविधा सुरू करणार – व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर

BJP on Thackeray Government | भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘मध्य प्रदेशला जमलं ते राज्य सरकारला का जमलं नाही ?’

Related Posts