IMPIMP

Pune Crime News | रूम भाड्याने देताय सावधान; डिपॉझिट पाठविण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Beware of renting a room; Fraud of a woman on the pretext of sending a deposit

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | तुम्हाला रुम भाड्याने द्यायची आहे. समोरची व्यक्ती रुम पाहण्याअगोदरच भाडे व डिपॉझिट
ऑनलाईन देण्यास तयार असेल तर, सावधान, तो सायबर चोरटाही (Cyber Crime) असू शकतो. एका महिलेला सायबर चोरट्याने ९९ हजार ९९०
रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत रास्ता पेठेत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७४/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची खराडी येथे रुम आहे. ती भाड्याने द्यायची आहे.
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी त्यांना एक फोन आला. तुमची रुम भाड्याने घेण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.
ऑनलाईन डिपॉझिट पाठवित असल्याचे सांगून त्यांच्याकडून बँकेची गोपनीय माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत. (Pune Crime News)

सध्या अनेक जण घर, रुम भाड्याने देत असतात. त्याच्या जाहिराती सोशल मीडियावर करत असतात.
त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे फसवित आहेत. तेव्हा घर, रुम न पाहता, प्रत्यक्ष न येता डिपॉझिट,
भाडे ऑनलाईन देण्यास कोणी तयार असेल तर सावध रहा. कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका,
असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime News | Beware of renting a room; Fraud of a woman on the pretext of sending a deposit

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात दोन कारवायात 11 लाखांचे अमली पदार्थ जप्त; कॅथा इडुलिस खत, ड्रग्ज प्रथमच पकडले, दोन परदेशी नागरिकांना अटक

FIR On NCP Sachin Dodke | राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंविरूध्द गुन्हा दाखल; भाजप सरचिटणीसाला धमकावून कामगारांना केली मारहाण

Jalgaon Crime News | पत्नी कामावर गेल्याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

Prakash Mahajan | ‘हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे…’, प्रकाश महाजनांचा टोला

Related Posts