IMPIMP

Pune Crime News | चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून, कोंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | husband killed his wife due to suspicion of character

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion of Character) घेत पतीने पत्नीचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना (Pune Crime News) कोंढव्यातील पिसोळी भागात घडली असून याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती फरार झाला आहे.

आरती रणजीत झा Aarti Ranjeet Jha (वय-26 रा. पिसोळी, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा Husband Ranjit alias Vikas Jha (वय-36) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आरतीचे काका राजेश रामकृपाल झा (वय-37) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime News)

आरोपी मुळचा बिहारचा असून तो चालक आहे. तर आरती एका सराफी पेढीत काम करते. या दोघांचा सहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. एक महिन्यापूर्वी ते पिसोळी परिसरात राहायला आले आहेत. रणजीत आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सोमवारी (दि.29) रात्री साडेदहाच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरतीचे काका राजेश झा (Rajesh Jha) यांनी घरी जाऊन दोघांमधील वाद मिटवला. मध्यरात्री आरती गाढ झोपेत असताना रणजीतने तिचा धारदार चाकूने गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior PI Santosh Sonwane),
पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (PI Sanjay Mogle), संदीप भोसले यांनी घटनास्थळाला भेट दिली.
पत्नीचा खून करुन फरार झालेल्या आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title : Pune Crime News | husband killed his wife due to suspicion of character

Related Posts