IMPIMP

Pune Crime News | पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

by sachinsitapure
Murder Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | नर्‍हे परिसरातील डोंगराच्या पायथ्याला रविवारी (दि.19) सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्यात मारहाण करून त्याचा खून (Murder In Pune) केल्याचे उघडकीस आले आहे. सौरभ रुपेश शिंदे Saurabh Rupesh Shinde (वय-23 रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार, कात्रज – Ambegaon Pathar Katraj) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अनिकेत मुकुंद परदेशी Aniket Mukund Pardeshi (वय-28 रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, नऱ्हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सौरभचे वडील रुपेश नामदेव शिंदे (वय-49 रा. आंबेगाव पठार पोलीस चौकी जवळ, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांत (Sinhagad Road Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 302 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. ही घटना स्वामी नारायण मंदिरापाठीमागील डोंगराखाली घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. सौरभ आरोपीच्या घरी जेवण करत होता. त्यावेळी त्याने अनिकेतच्या पत्नीबाबत अपशब्द बोलला. याचा राग मनात धरुन अनिकेत याने सौरभला स्वामी नारायण मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने सौरभच्या डोक्यात कठीण वस्तुने मारुन त्याचा खून (Pune Murder News) केला. (Pune Crime News)

दरम्यान, सौरभ शिंदे हा आंबेगाव येथील रहिवासी असून शनिवार (दि.18) पासून तो बेपत्ता होता.
त्याचा संपर्क होत नव्हता. दरम्यान, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या
डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह पडला असल्याची माहिती नागरिकांनी नऱ्हे पोलीस चौकीत दिली.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव (API Rahul Yadav) करीत आहेत.

Related Posts