IMPIMP

Pune Crime News | महिला पोलिसला गुंगीचे औषध देऊन बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा, प्रचंड खळबळ

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येत असताना गुंगीचे औषध (Gungy Medicine) देऊन पोलीस शिपायाने (Police Constable) महिला पोलीस कर्मचार्‍यावर (Female Police) बलात्कार (Rape in Pune) केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार (Female Police Officer Rape Case) केला. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Pune Police) मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) नेमणूक असलेल्या दीपक सिताराम मोघे (Deepak Sitaram Moghe) या पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा दखल केला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९४/२३) दिली आहे. हा प्रकार पोलीस वसाहत (Police Colony) तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही पुणे शहर पोलीस दलात (Pune City Police Force) नेमणूकीला असून पोलीस वसाहतीत रहायला आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादीशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो येत होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्या व त्रास होत असल्याने फिर्यादीला त्याने गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन फिर्यादी यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध (Physical Relationship) केले.

त्याची चित्रफित तयार केली. हा प्रकार समजल्यावर त्यांनी जाब विचारताच त्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,
लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला.
त्याच्या या त्रासाला कंटाळून शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार (API Totewar) तपास करीत आहेत.

Pune Crime News | पुणेः हडपसर पोलिस स्टेशनच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीतून बलात्काराच्या गुन्हयातील
आरोपीचे पलायन, पोलिसांना धक्का देवून काढला पळ

Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक; 43 लाखांची 7 वाहने जप्त

Related Posts