IMPIMP

Pune Crime News | अमेरिकेतून पुणे पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन; मुंबईत दहशतवादी शिरला असल्याचे सांगितले

Pune Crime News | Threatening call from America to Pune Police Control Room; It is said that terrorists have entered Mumbai

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मुंबईत दहशतवादी शिरला (Terrorist In Mumbai) असल्याचे सांगणारा फोन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) मंगळवारी सकाळी आला. याची माहिती पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिली. सायबर पोलिसांची (Pune Cyber Police) याचा तपास सुरु केल्यावर हा फोन चक्क अमेरिकेतून (America) आल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आज सकाळी एक फोन आला. फोन करणार्‍याने मुंबईतील वरळीच्या एपिक कॅपिटल कार्यालयात दहशतवादी शिरला असल्याचे सांगून फोन कट केला. ही माहिती तातडीने मुंबई पोलिसांना देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हा फोन अमेरिकेतून आल्याचे निष्पन्न झाले आहे.(Pune Crime News)

 

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सॉफ्टवेअरच्या मदतीने असे कॉल हे स्थानिक पातळीवरुन केले जातात.
मात्र, त्यात लोकेशन हे दुसरे दाखविता येते, असाच प्रकार कोणी केला आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.