IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले

by nagesh
Pune Crime News | Thrill in Nana Peth Pune! 47 lakhs were robbed from a trader in broad daylight by showing fear of weapon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत (Nana Peth, Pune) भरदिवसा हत्याराचा धाक दाखवुन आणि झटपाट करून व्यापार्‍याकडील 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 चेक मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी जबरदस्तीने लुटले आहेत (Robbery In Pune). दिवसाढवळया आणि गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी (Pune Police) धाव घेतली आहे. (Pune Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यासंदर्भात मंगलपूरी भिमकपूरी गोस्वामी (55, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोस्वामी हे पन्ना एजन्सी या दुकानात नोकरी करतात. दुकानातील व्यवसायाची एकुण रक्कम 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 हे एका पिवळसर रंगाच्या बॅगमध्ये घेऊन गोस्वामी हे अ‍ॅक्टीव्हावरून घेऊन जात होते. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर 395 ब येथील सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना काळया रंगाच्या दुचाकीने त्यांना मागुन धक्का दिला. चोरटयांनी त्यांची गाडी फिर्यादीच्या समोर आडवी घालून त्यांना हाताने मारहाण केली. लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन गोस्वामी यांच्याकडील बॅग आणि त्यामध्ये असलेली रोख रक्कम आणि चेक हे जबरदस्तीने लुटले. काही क्षणातच चोरटयांनी तेथून पळ काढला. (Pune Crime News)

झालेल्या मारहाणीत गोस्वामी यांच्या उजव्या हाताला खरचटले असुन पाठीला मुका मार लागला आहे.
त्यांना ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह गुन्हे शाखेतील अधिकारी (Pune Police Crime Branch) व समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

दिवसाढवळया नाना पेठेत अगदी गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून व्यापार्‍यांमध्ये
चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime News | Thrill in Nana Peth Pune! 47 lakhs were robbed from a trader in broad daylight by showing fear of weapon

हे देखील वाचा :

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | एकुलत्या एका मुलाचा विरह सहन न झाल्याने आईने उचलले ‘हे’ पाऊल

Dr Raman Gangakhedkar | शाश्वत धोरणांचा अवलंब करीत सीएसआर अंतर्गत सामाजिक प्रश्न सोडवता येणे शक्य – पद्मश्री डॉ रमण गंगाखेडकर

Devendra Fadnavis | ‘हे कोण आलेत, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का?’, राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक (व्हिडिओ)

Related Posts