IMPIMP

Pune Crime News | वानवडी पोलीस स्टेशन : बी.टी. कवडे रोडवर सिनेकलाकरांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक, 74 हजारांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime News Wanwadi Police Station : Two arrested for robbing movie actors on B.T. Kavade Road, 74 thousand in valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघालेल्या सहकलाकारांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लुटण्यात आल्याची घटना बी. टी. कवडे रस्त्यावर (B. T. Kawade Road) घडली. ही घटना (Pune Crime News) 21 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना वानवडी पोलिसांनी (Pune Police) अटक करुन त्यांच्याकडून 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्वप्नील दादा कोतवाल (वय-23 रा. शिंदे वस्ती, हडपसर, पुणे), महेश बबन गजेसिंह (वय-29 रा. भिमनगर, मुंढवा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी हे मराठी चित्रपटात सहकलाकार आहे. फिर्य़ादी आणि त्याचे सहकारी हर्ष नाथे, जिशान पटनी चित्रीकरणासाठी निघाले होते. पहाटे चारच्या सुमारास ते बी. टी. कवडे रस्त्यावर एका टपरीवर ते चहा प्यायला थांबले होते. त्या वेळी एक जण तेथे आला. त्याच्याबरोबर साथीदारही होते. (Pune Crime News)

आरोपीने फिर्य़ादी यांना धक्का मारुन टपरी मागील मोकळ्या व अडचणीच्या जागेत घेऊन गेला. त्याठिकाणी असलेल्या एकाने धारदार हत्यार काढून मानेवर ठेवून फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल आणि पैसे जबरदस्तीने काढून घेतले. फिर्य़ादी यांचे मित्र त्याठिकाणी आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे, मोबाईल घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास तरत असताना पोलिसांनी घटनास्थळावरील साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच फिर्य़ादी व त्यांच्या मित्रांच्या मोबाईल आयएमईआय सीडीआर याचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल, कोयता तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 74 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware)

यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Senior PI Bhausaheb Pathare),
पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप शिवले (PI Sandeep Shivle), पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे
(PSI Santosh Sonwane), पोलीस अंमलदार अणोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अतुल गायकवाड,
अमजद पठाण, संतोष नाईक, हरिदास कदम, महेश गाढवे, विनोद भंडलकर, संदिप सावळे,
विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, मनिषा सुतार, सोनम भगत यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News Wanwadi Police Station : Two arrested for robbing movie actors on
B.T. Kavade Road, 74 thousand in valuables seized

Related Posts