IMPIMP

Pune Crime | कैलास स्मशानभूमीतील जळीत प्रकरणात भाजलेल्या एकाचा मृत्यु; रॉकेल टाकणार्‍याला अटक

by nagesh
Pune Crime News | Exciting! 2 children including a woman were killed and the bodies were burnt; Incident in Kondhwa

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अंत्यविधीच्या चितेवर रॉकेल टाकताना भडका उडल्याने कैलास स्मशानभूमीतील (Kailas Cemetery Pune) घटनेत ११ जण जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना एकाचा मृत्यु झाला. याप्रकरणी आगीचा भडका उडवून लोकांना जखमी करण्यास कारणीभूत ठरलेल्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) अटक केली आहे. (Pune Crime)

गणेश सर्जेराव रणसिंग (वय ४९, रा. दत्तविहार, आव्हाळवाडी, वडजाई, वाघोली) अशी अटक केलेल्याचे नाव आहे. या घटनेत रॉकेलची कॅन ज्याच्या ताब्यात होती ते अनिल बसन्ना शिंदे (वय ५३, रा. ताडीवाला रोड) यांचे उपचार सुरु असताना निधन झाले आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत प्रतिक दीपक कांबळे (वय २४, रा. महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १०८/२२) फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, दीपक कांबळे यांच्यावर कैलास स्मशान भूमीमध्ये ३० एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येत होते. चितेस अग्नि देण्यात आला होता. त्यापासून काही अंतरावर महिला व पुरुष बसले होते. गणेश रणसिंग याने अनिल शिंदे याच्याकडील रॉकेलचा कॅन घेतला व कॅनमधील रॉकेल अग्नी दिलेल्या चितेवर ओतू लागला. तेव्हा भडका उडाल्याने त्याच्या हातातील कॅन पेटला. तेव्हा त्याने पेटलेला कॅन जोरात फेकला. तो बाजूला बसलेल्या नातेवाईकांच्या अंगावर पडून त्यात ११ जण भाजले. या सर्वांवर ससून व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. उपचार सुरु असताना अनिल शिंदे यांचा मृत्यु झाला असून दोघे जण गंभीर जखमी आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | One burnt to death in a burning case at Kailas Cemetery pune

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंच्या समर्थनार्थ अमेरिकेत घुमला हनुमान चालीसेचा आवाज (Video)

Navneet Rana-Ravi Rana | राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर; अखेर 12 दिवसानंतर कोठडीतून सुटका

Pune Water Supply | गुरुवारी (उद्या) पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Supreme Court On Maharashtra Municipal Elections | सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ! 2 आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा

Related Posts