IMPIMP

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना सिंहगड पोलिसांकडून अटक; 2 पिस्टल 3 काडतुसे जप्त

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन बेकायदेशीर रित्या आणि विनापरवाना पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी दोघांना पुण्यात (Pune Crime) अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) ही कारवाई वडगाव बु येथील फन टाईम थिएटरच्या (Funtime Theater) मागील कॅनॉल रोडवर केली. या कारवाईत (Pune Crime) पोलिसांनी 2 पिस्टल (pistol) आणि 3 जिवंत काडतुसे (cartridges) असा एकूण 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दिपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप (वय-26 रा. मु.पो. रांझे ता. भोर), हर्षल दिलीप चव्हाण (वय-22 सध्या रा. मु.पो. ढाकाळी पणदरे, ता. बारामती मुळ रा. मु.पो. संभाजी चौक खंडाळा, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दिपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप हा सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस (Pune Police) अमंलदार उज्ज्वल मोकाशी (ujjwal Mokashi) यांना वडगाव बु येथील फनटाईम थिएटरच्या मागील बाजूस असलेल्या कॅनॉलच्या रोडवर दोन व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात (Pune Crime) घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता जगताप याच्या कमरेला 40 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि खिशात 600 रुपयाचे दोन जिवंत काडतुसे सापडली. तर हर्षल चव्हाण याच्याकडे 30 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि 300 रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस सापडले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole),
पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ (PSI Kuldeep Sankapal), पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी,
शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील,
अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Sinhagad police arrest two for carrying pistol; 2 pistols 3 cartridges seized

हे देखील वाचा :

Priyanka Chopra | प्रियंका चोप्राच्या ‘या’ कृत्याने निक जोनस आणि तिच्यात होणार डिवोर्स?

Pune Crime | चाकण बस स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे अर्भक

Aamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

Nawab Malik | ‘पुरावा दिला तर…’ ! नवाब मलिकांनी शेअर केला क्रांती रेडकरच्या चॅटचा स्क्रीनशॉट

Related Posts