IMPIMP

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

by Team Deccan Express
Pune Crime | Raids on village liquor outlets in Bibwewadi; One thousand liters of village liquor seized, two arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune Crime | बिबववेवाडीतील झांबरे वस्ती (Zambre Vasti in Bibwewadi) परिसरात बेकायदा गावठी दारू (Illegal Liquor Sale In Pune) विक्री अड्डयावर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Crime Branch SS Cell) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटर गावठी दारू जप्त केली. दारू विक्री प्रकरणात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अनिल यशवंत गुप्ते (वय २८) आणि विजय सीताराम कट्टीमणी (वय २४, दोघे रा. अण्णाभाऊ साठेनगर, झांबरे वस्ती, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली. दारू विक्री प्रकरणात शारदा किसन सोनावणे (वय ६०) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

बिबवेवाडीत अण्णाभाऊ साठेनगर (Annabhau Sathe Nagar, Bibvewadi) परिसरात गावठी दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला (Pune Police Crime Branch SS Cell) मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक हजार लिटर गावठी दारू आणि रोकड असा ४० हजार ६८० रुपयाचां माल जप्त केला आहे. (Pune Police Action On Illegal Liquor Sale)

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), बाबा करपे, राजश्री मोहिते, केकाण, कांबळे, चव्हाण, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.

Web Title : Pune Crime | Raids on village liquor outlets in Bibwewadi; One thousand liters of village liquor seized, two arrested

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts