IMPIMP

Pune Crime | ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला अन् तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’ ! धमकी देऊन 17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Abusing a minor girl with threat of defamation; Incidents in Yerawada area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’, असे धमकावून व ब्लॅकमेल करुन एका १७ वर्षाच्या युवकाने त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार धायरी (Dhayari News) येथे २० जून २०२० पासून आतापर्यंत सुरु होता. फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची उत्तमनगर (Uttam Nagar News) येथील १७ वर्षाच्या मुलाबरोबर ओळख होती. त्याने या मुलीला धमकावून व ब्लॅकमेल (Blackmail) करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी त्याच्याशी बोलत नव्हती. तेव्हा त्याने “तू ऐवढे दिवस माझ्याशी बोलली नाहीस तुला माझ्याशी बोलावेच लागेल. आपल्यात सर्व काही झालेले आहे. तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल. नाही तर माझे दाजी नगरसेवक आहेत. तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही,” अशी धमकी दिली. या प्रकारानंतर तिने हे सर्व आपल्या आईला सांगितले. त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार (Pune Crime) दिली. पोलिसांनी या मुलाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक तांदळे (API Tandale) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Rape on 17 years old girl in sinhagad raod police station area

हे देखील वाचा :

Pune Crime | ड्रेनेजचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने चक्क घरात घुसून 15 वर्षाच्या मुलीला विवस्त्र करण्याचा केला प्रयत्न; गुलटेकडी परिसरातील घटना

PPF Account मुलांपासून मोठ्यांच्या नावाने उघडता येते, NSC पेक्षा मिळते जास्त व्याज; RD पेक्षा सुद्धा याबाबतीत चांगले

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts