IMPIMP

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक केलेल्याने दुकानाच्या भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला. ज्वेलर्समधील १२ लाख रुपयांचे दागिने, रोकड चोरुन पत्नीला घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी सुनिल सोमनाथ सोनवणे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यावरुन पोलिसांनी विरेंद्र बहाद्दूर शहा व त्याची पत्नी (रा़ नेपाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोनवणे यांचे घुलेनगरमधील आकासिया इमारतीत श्री स्वामी कृपा ज्वेलर्स या नावाचे दुकान आहे. विरेंद्र शहा याला या इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात आले असून तो तेथेच रहात होता. त्याने १ डिसेबर रोजी दुपारी ४ ते २ डिसेंबर सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद असताना पाठीमागील भिंतीला भोक पाडले. त्यातून आत प्रवेश केला. दुकानातील मुख्य लोंखडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. ती न फुटल्याने काचेच्या काऊंटरमधील ६ लाख २ हजार ७०० रुपयांचे १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ लाख ३१ हजार ५० रुपयांचे ७ किलो चांदीचे दागिने आणि ७० हजार ५०० रुपये असा एकूण १२ लाख ४ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरी करुन घेऊन (Pune Crime) गेला. जाताना तो आपल्या पत्नीलाही घेऊन पळून गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Security guard enters Jewelers and steals Rs 12 lakh; He made a hole in the wall and entered the shop, ran away with his wife

हे देखील वाचा :

EPF Passbook Download | EPF Passbook डाउनलोड करता येत नाही? तर, जाणून घ्या सोपी पद्धत

Farmers Loan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आता पहिल्यापेक्षा जास्त सहजपणे मिळेल कर्ज, SBI ने Adani Capital सोबत केली भागीदारी

Omicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेले तब्बल 9 प्रवासी बाधित

Devendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद पवारांची साथ; फडणवीसांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Vijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

Related Posts