IMPIMP

Pune Crime | सराईत गुन्हेगार संकेत सुनिल गायकवाड पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील गुन्हेगारांवर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संकेत सुनिल गायकवाड Sanket Sunil Gaikwad (वय – 25 रा. कवडपाट टोल नाका, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) याला दोन वर्षांसाठी पुणे (Pune Crime) आणि पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडीपार (Tadipar) करण्यात आले आहे. आरोपीच्या तडीपारीचे आदेश पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी मंगळवारी (दि.22) दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरोपी संकेत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, लोणी स्टेशन परिसरात दहशत निर्माण करुन गुन्हे (Pune Crime) केले आहेत. तसेच आरोपीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिक त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi)
यांनी आरोपी संकेत गायकवाड याचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता.
प्रस्तावाची पडताळणी करुन मंगळवारी आरोपी संकेत गायकवाड याला पुणे शहर (Pune City),
पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate), पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale), पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे (PSI Bhagwat Shendge),
पोलीस अंमलदार गणेश सातपुते, संदिप धनवटे, मल्हारी ढमढेरे यांनी केली आहे.

Web Title :- Pune Crime | Sunil Gaikwad deported from Pune district for two years Loni Kalbhor Police Station CP Amitabh Gupta

हे देखील वाचा :

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरला मिळाली मंजूरी, झाले कन्फर्म ! ‘इतकी’ वाढेल सरकारी कर्मचार्‍यांची सॅलरी

Urfi Javed Viral Video | उर्फी जावेदनं घातलेल्या स्कर्टला पाहून नेटकऱ्यांना आठवला कावळा, गमतीदार कमेंट्स करत तिला केलं ट्रोल

Benefits Of Cycling | सायकलिंगचे फायदे ! मधुमेह अणि हृदयविकाराचा धोका होईल कमी

Related Posts