IMPIMP

Pune Crime | फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन बदनामी केलेल्या विद्यार्थ्याला शिक्षिकांनी केली मारहाण; लोणीकंद पोलिस ठाण्यात FIR

by Team Deccan Express
Pune Crime | Teacher beats student for defaming student by creating fake Instagram account FIR at Lonikand Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट (Fake Instagram Account) तयार करुन त्यावर अश्लिल मजकूर (Pornographic Text) पोस्ट करुन बदनामी करणार्‍या शिक्षिका व तिच्या सहकार्‍यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद Lonikand Police Station (गु. रजि. नं. २४६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका शाळेतील शिक्षिका, शिक्षक व शिक्षिकेचा पती अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा विद्यार्थ्यांनी बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन त्यावर अश्लिल मजकूर टाकून बदनामी केली होती.
त्याची तक्रार शिक्षिकेने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) केली होती.
ही तक्रार मागे घ्यायची आहे, असे सांगून या शिक्षिकेने फिर्यादी याला बोलावून घेतले.
फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनविले आहे. तसेच यापूर्वी शाळेत कोण कोण दारु पित होते.

कोण कोण तोडफोड करीत होते, ते लिहून देण्यास सांगितले. फिर्यादीने तसे लिहून देण्यास नकार दिला.
तेव्हा या शिक्षिकेने फिर्यादीला हाताने पोठात व डोक्यात बुक्क्यांनी व चार पाच कानाखाली मारल्या.
तिच्या पतीने पाठीत रॉडने मारले. शाळेतील दोन शिक्षकाने हाताने दंडावर मारहाण केली.
फिर्यादीवर उपचार केल्यानंतर त्याने आता फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Teacher beats student for defaming student by creating fake Instagram account FIR at Lonikand Police Station

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts